
शिवसेनेकडून अनेक वर्षांपासून उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असाच करण्यात येत आहे.
उस्मानाबाद : सध्या औरंगाबादच्या नामांतराचा विषय गाजत आहे. अनेक राजकीय नेते, पक्ष आपली भूमिका स्पष्ट करित आहेत. काही दिवसांपूर्वी औरंगाबादबाबत महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णय मुख्यमंत्री कार्यालयाच्या (सीएमओ) टि्वटर हँडलवर दोन वेळेस औरंगाबादऐवजी संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला होता. आता बुधवारी (ता.13) मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवर उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव करण्यात आला आहे. या टि्वटमध्ये धाराशिव - उस्मानाबाद येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला संलग्न 430 खाटांचे रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.
शिवसेनेकडून अनेक वर्षांपासून
शिवसेनेकडून अनेक वर्षांपासून उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असाच करण्यात येत आहे. आता तर मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवर अधिकृत धाराशिव असा उल्लेख केला गेला आहे. यावर काँग्रेसची प्रतिक्रिय काय असेल हे पाहावे लागणार आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे आणि यातच शहराच्या नामांतराचा मुद्दा गाजत आहे. यामुळे शिवसेनेला किती मते मिळतील? मुख्यमंत्री कार्यालयाकडून संभाजीनगर असा उल्लेख केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोध दर्शवला होता. आता ते काय भूमिका घेणार?
मराठवाड्याच्या आणखी बातम्या वाचा
उदयनराजे भोसले यांचाही नामांतराला पाठिंबा, तर आनंदराज आंबेडकरांचा नकार
उदयनराजे भोसले यांनी औरंगाबादच्या संभाजीनगर या नामांतराला पाठिंबा जाहीर केला आहे. दुसरीकडे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी पुण्याचे संभाजीनगर असे नामांतर करा व औरंगाबादचे नाव औरंगाबादच राहावे अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी आंदोलनही छेडले जाईल असा इशाराही त्यांनी औरंगाबाद येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.
Edited - Ganesh Pitekar