नव्या ठेकेदाराकडील वरणात झुरळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

लातूर - सामाजिक न्याय विभागाच्या येथील शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच सोमवारी मुलांना नव्या ठेकेदारांकडून देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळले. तशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्यावर भोजनाच्या ठेक्‍याचे नेमके करायचे काय, हा प्रश्न सध्या या विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर आहे. दरम्यान, विषबाधेनंतर उपचार घेऊन रात्री वसतिगृहात परतलेल्या विद्यार्थ्यांना रात्री दोनपर्यंत खिचडी देण्यात आली.

या शासकीय वसतिगृहातील दोनशेवर विद्यार्थ्यांना रविवारी (ता. 4) जेवणातून विषबाधा झाली होती. त्यांच्यावर उपचारही करण्यात आले. विषबाधेच्या घटनेनंतर सोमवारी संबंधित ठेकेदाराकडून दिले जाणारे जेवण बंद करण्यात आले. याच विभागाची एमआयडीसीमध्ये निवासी शाळा आहे. या शाळेसाठी भोजन पुरविणाऱ्या ठेकेदाराकडूनच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जेवण मागविण्यात आले होते. या ठेकेदाराने पुरविलेल्या वरणात झुरळ आढळल्याची तक्रार एका मुलाने केली. त्याला इतर मुलांनीही साथ दिली. त्यामुळे या ठेकेदाराचेही जेवण नको असा पवित्रा मुलांनी घेतला. त्यामुळे अधिकाऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. या विभागाचे वरिष्ठ अधिकारी मुलांसोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: cockroaches in new contractor varan

टॅग्स