Corona-virus : सर्दी, खोकला झाला म्हणजे कोरोना झाला म्हणायचं का..! घ्या जाणून सविस्तर..!  

सयाजी शेळके 
Tuesday, 21 July 2020

जिल्ह्यात सध्या सर्वत्र सर्दी-खोकला झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यातून अनेकांना कोरोना झाल्याचा भास होऊ लागला आहे. मात्र सर्दी खोकला झाला म्हणजे कोरोना झाला असा भाग नसल्याचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी सांगत आहेत.

उस्मानाबाद : जिल्ह्यात सध्या सर्वत्र सर्दी-खोकला झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यातून अनेकांना कोरोना झाल्याचा भास होऊ लागला आहे. मात्र सर्दी खोकला झाला म्हणजे कोरोना झाला असा भाग नसल्याचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, काळजी घ्यावी असा सूचक सल्लाही तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!  

शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दररोज रुग्णांची संख्या २० ते २५ ने वाढत असून गेल्या आठ दिवसात आकडा दुपटीने वाढला आहे. मात्र सध्या हवामानामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे. सकाळच्या सत्रात कधी थंडी जाणवते तर कधी उकाडाही जाणवतो. त्याशिवाय पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पाण्याचा संचय झालेला आहे. त्यातून डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे सात रोगाचे प्रमाण वाढत आहे. अशाच परिस्थितीत अनेकांना हवामान बदलामुळे सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवत आहे. ही लक्षणे किरकोळ असली तरी यातून अनेकांच्या मनामध्ये भीती निर्माण होत आहे की आपल्या झाला की काय?

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

काय करावे
सर्दी अथवा खोकला झालेल्या प्रत्येक व्यक्तीला कोरोना झाला आहे असे नव्हे. तर त्यांनी स्वतःची प्रवासाची हिस्ट्री तपासणे गरजेचे आहे. कुटुंबातील कोणी व्यक्ती बाहेर कुठून येते? कुठे जाते? यावरही विचार करून त्या संदर्भात काळजी घेणे गरजेचे आहे? घराबाहेर जाताना तसेच घरात येताना हात स्वच्छ धुणे. अथवा सॅनीटाईज करणे गरजेचे आहे. सर्दी- खोकल्याचा त्रास जाणवत असेल अन तापाची लक्षणे जाणवत असतील. तर त्या संदर्भात पुढील उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी घाबरू नये. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

दिवसातून तीन-चार वेळा वाफ घेणे. हळद टाकून दूध पिणे. सकाळच्या सत्रात कोमट पाण्याने गुळण्या करणे. काढा करून पिणे असे घरगुती आयुर्वेदिक उपचार करूनही सर्दी खोकल्यावर ती नियंत्रण ठेवता येते. जवळील वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा मात्र घाबरून जाण्याचे कुठलेही कारण नाही. जरी कोरोना झाला तरी तो बरा होत नाही, असे नव्हे. योग्य उपचार घेऊन अनेकजन कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. 

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

(संपादन : प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cold cough means corona know take in detail