परभणीत थंडीचा कडाका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

परभणी - परभणी जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत असून, बुधवारी (ता. 28) किमान तापमानाचा पारा 9.05 अंश सेल्सिअसवर आला. दरम्यान, मराठवाड्याच्या अन्य जिल्ह्यांत यंदा लांबलेली थंडी आता जाणवू लागली आहे.

परभणी - परभणी जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत असून, बुधवारी (ता. 28) किमान तापमानाचा पारा 9.05 अंश सेल्सिअसवर आला. दरम्यान, मराठवाड्याच्या अन्य जिल्ह्यांत यंदा लांबलेली थंडी आता जाणवू लागली आहे.

परभणीत नोव्हेंबरच्या दुसऱ्या अठवड्यात थंडीचा जोर वाढलेला होता. मध्यंतरी ढगाळ वातावरण तयार झाल्याने आठवडाभर थंडी गायब होती. गेल्या रविवारपासून थंडीचा जोर पुन्हा वाढू लागला आहे. येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागात आज पहाटेचे तापमान 9.05 अंश नोंदले गेले; तर दुपारच्या तापमानातदेखील घट झाली असून ते 30 अंश होते.

Web Title: Cold Increase in Parbhani District