परभणीचा पारा आठ अंशांवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

उस्मानाबाद, नांदेड, औरंगाबादमध्येही थंडीत वाढ
परभणी - मराठवाड्यातील परभणी, नांदेड, औरंगाबादमध्ये थंडीचे प्रमाण वाढले असून मंगळवारी (ता. 20) परभणीचा पारा आठ अंशांवर आला. अन्य जिल्ह्यांच्या तापमानात मोठी घट नसली तरी रात्री ते पहाटेदरम्यान कमी-अधिक थंडी जाणवत आहे.

परभणीत गेल्या शनिवारी (ता. 10) किमन तापमा 7.5 अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. या हंगामातील ते सर्वांत निचांकी होते. त्यानंतर आज पुन्हा ते घसरले आणि पारा आठ अंशांवर आला. त्यामुळे हुडहुडी असून सायंकाळनंतरच ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरातही ठिकठिकाणी शेकोट्य पेटत आहेत. नागरिकांना ऊबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. अनेकांनी ऊबदार कपडे खरेदीकडे मोर्चा वळविला असून दुकानांवर गर्दी वाढली आहे. शहरात दाखल झालेल्या तिबेटी विक्रेत्यांकडेही वर्दळ वाढली आहे. दरम्यान, उस्मानाबाद, औरंगाबाद, नांदेडमध्येही थंडीत वाढ झाली आहे.

किमान तापमान असे
परभणी - 8.0
उस्मानाबाद 10.6
औरंगाबाद 10.6
नांदेड- 11.2
हिंगोली 14.0
जालना 14.0
लातूर 16.0
बीड 16.0

Web Title: cold in parbhani