परभणीच्या हुडहडुीत दिवसेंदिवस वाढच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

किमान तापमान 6.7 अंशांवर
औरंगाबाद - उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर भारतासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात घट झाली आहे. गुरुवारी (ता. 22) राज्यात सर्वांत कमी तापमान नगरचे 5.9 अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यानंतर परभणीचा क्रमाक असून तेथील किमान तापमान 6.7 अंश सेल्सिअस होते.

गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील परभणी, नांदेड, उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढते आहे. आज परभणीचा पारा आणखी घसरून तो 6.7 ंअंशांवर आला. त्यामुळे मराठवाड्यात सर्वांत हुडहुडी या शहरासह परिसरात आहे.

काही शहरांचे किमान तापामान अंश सेल्सिअसमध्ये असे ः जळगाव 8.4, नाशिक 8.6, पुणे 9.0, अमरावती 9.6, उस्मानाबाद 10.1, औरंगाबाद 10.7, नांदेड 11.6.

Web Title: cold in parbhani