परभणीचा पारा सहा अंशांवर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

परभणी - जिल्ह्यात कडाक्‍याची थंडी पुन्हा परतली असून, रविवारी (ता. 10) पारा 6.3 अंशांवर घसरला; तर शनिवारचे तापमान सात अंशांवर होते. ऐन उन्हाळ्याची चाहूल लागताच परतलेल्या थंडीमुळे जिल्ह्यात शेकोट्या पेटत आहेत. जिल्ह्यात नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत कडाक्‍याची थंडी होती. पारा अगदी तीन अंशांवर गेला होता. त्यानंतर सतत तीन महिले पारा दहा अंशांखाली राहिल्याने परभणीकरांनी कडाक्‍याची थंडी अनुभवली.

फेब्रुवारीच्या सुरवातीलाच थंडीचा जोर कमी झाला. गुरुवारी पारा 14 अंशांवर होता. दुपारीही चटके बसत होते. मात्र, उत्तर भारतातील गारपिटीमुळे शुक्रवारपासून थंडीत वाढ झाली आहे. दरम्यान, रविवारी नांदेडचे तापमान 11, तर हिंगोली 15 अंशांवर होते.

Web Title: Cold Parbhani Temperature 6 degree

टॅग्स