दिलासादायक - हिंगोलीत सोमवारी अकराजण कोरोनामुक्त

mukta
mukta

हिंगोली ः येथील जिल्‍हा सामान्य रुग्णालयात सहा, वसमत येथील एक व कळमनुरी येथील चार असे एकूण अकरा कोरोना रुग्ण बरे झाल्याने त्‍यांना डिस्‍चार्ज देण्यात आला. आता जिल्‍ह्यात १७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी सोमवारी (ता.२२) दिली. 

हिंगोली येथील जिल्‍हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डातील सहा कोरोना रुग्ण बरे झाल्याने त्‍यांना डिस्‍चार्ज देण्यात आला. यात चार पेन्शनपुरा येथील एक भोईपुरा तर एक कमलानगर येथील रहिवासी आहे. वसमत येथील अशोक नगर येथील एक, कळमनुरी केअर सेंटर येथील चार रुग्णात तीन दाती तर एक रुग्ण डोंगरकडा येथील आहे. ते बरे झाल्याने एकूण अकरा रुग्णांना डिस्‍चार्ज देण्यात आला. 

सतरा रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत जिल्‍ह्यात एकूण २४० रुग्ण झाले, त्‍यापैकी २२३ रुग्ण बरे झाल्याने त्‍यांना डिस्‍चार्ज देण्यात आला. तर सध्या १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हिंगोली जिल्‍ह्यात लागण झालेले व उपचारासाठी कोरोना केअर सेंटर वसमत येथे दोन रुग्ण आहेत. यात एक बुधवारपेठ तर दुसरा मुरुंबा येथील आहे. त्‍यांची प्रकृती स्‍थिर असून त्‍यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. 

एक जवान औरंगाबाद येथे संदर्भित 
कळमनुरी येथील केअर सेंटर येथे तीन रुग्ण आहेत. यात दोन काजी मोहल्‍ला तर एक टव्हा येथील आहे, त्‍यांची प्रकृती स्‍थिर असून त्यांनाही कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत तसेच डेडीकेट हेल्‍थ सेंटर कळमनुरी येथे तीन रुग्ण आहेत. यात एसआरपीएफ जवान उपचारासाठी भरती आहेत. एक जवान विशेष काळजी म्‍हणून औरंगाबाद येथील धूत हॉस्‍पिटल येथे संदर्भित करण्यात आले आहे. 
 
हेही वाचा -  कविसंमेलन रंगले ऑनलाइन, रसिक श्रोत्यांचीही मिळाली दाद

दाखल रुग्णांची प्रकृती स्‍थिर 
लिंबाळा येथील केअर सेंटरअंतर्गत दोन रुग्ण आहेत. यात एक कनेरगाव नाका, एक संतुकपिंप्री येथील असून ते उपचारासाठी भरती आहेत. त्‍यांची प्रकृती स्‍थिर असून त्‍यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. जिल्‍हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात पाच कोरोना रुग्ण आहेत, यात तीन भगवती, एक वसमत येथील, एक जवळा बाजार येथील आहे. त्‍यांची प्रकृती स्‍थिर असून त्‍यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. त्‍यांच्यावर तज्ज्ञ वैद्यकीय टीममार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत. 

२१३ अहवाल प्रलंबित
सेनगाव येथे एक कहाकर बुद्रुक येथील एक रुग्ण भरती आहे. जिल्‍ह्यांतर्गत आयसोलेशन वार्ड सर्व कोरोना सेंटर आणि गाव पातळीवर तयार केलेल्या क्‍वारंटाइन सेंटरअंतर्गत चार हजार ७५ व्यक्‍तींना भरती केले आहे. त्‍यापैकी तीन हजार ६७० व्यक्‍तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तीन हजार ३८२ व्यक्‍तींना डिस्‍चार्ज देण्यात आला. सद्यस्‍थितीत ६८६ व्यक्‍ती भरती आहेत आणि आज रोजी २१३ अहवाल प्रलंबित असल्याची माहिती डॉ. श्रीवास यांनी दिली. 


कोरोना मीटर 
एकूण पॉझिटिव्ह - २४० 
उपचार घेत घरी परतलेले - २२३ 
उपचार सुरु - १७
मृत्यू - शून्य 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com