शरद पवार यांनी केलेली टिप्पणी निराशेच्या भूमिकेतून-जे. पी. नड्डा

प्रकाश बनकर
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी टिप्पणी केली ती अत्यंत निराशाजनक आणि हताशपूर्ण होती. ज्यांचे कार्यकर्ते पक्ष सोडून चालले, ज्या पक्षाच्या नेत्यांवर ईडीची चौकशी सुरू आहे, त्यांना पराभव दिसत असल्यानेच त्यांनी अशी टीका केल्याचे भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवारी (ता.12) सांगितले. 

महायुतीचे फुलंब्री मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार हरिभाऊ बागडे यांच्या प्रचारासाठी शनिवारी सिडको एन-दोन येथील विठ्ठलनगरात जाहीर सभा घेण्यात आली. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, नामदेवराव गाडेकर, एकनाथ जाधव, अनुराधा चव्हाण, सुहास सिरसाट, एकनाथ जाधव, ज्ञानोबा मुंडे, बन्सीलाल गांगवे, राधाकिसन पठाडे, राम शेळके, बाबासाहेब डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक भगवान घडमोडे यांनी केले. 

जे.पी. नड्डा म्हणाले, की तुरुंग आणि ईडीच्या चकरा मारणारे लोक राज्याला प्रगतीकडे नेऊ शकत नाहीत. ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जाण्याचा उद्देशाने लढवत आहोत. कॉंग्रेसच्या सरकारमध्ये सत्तेचा संगीतखुर्ची खेळ खेळला गेला. भाजप सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पाच वर्षे पूर्ण केली. हीच तुमच्या मतांची ताकद आहे. कलम 370 वरून त्यांनी कॉंग्रेसवर टीका केली.  हरिभाऊ बागडे म्हणाले, की कॉंग्रेसचे उमेदवार डोळे झाकून जातात की काय? कारण तालुक्‍यात विकास झाला, तरीही विकास झाला नसल्याचे ते सांगत आहेत. 

राष्ट्रवादीने वेगवेगळे पक्ष फोडून पक्ष तयार केला ः दानवे 

कॉंग्रेस व राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे भाजपमध्ये इनकमिंग झाले. राष्ट्रवादीने इतर पक्षांतून फोडफाड करूनच पक्ष तयार केलेला आहे, असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावला. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Comment by Sharad Pawar from the role of frustration- j. P. Nada