आयुक्त इंदूरमध्ये, महापालिकेत शुकशुकाट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

औरंगाबाद - महापालिका आयुक्तांसह पदाधिकारी इंदूर दौऱ्यावर गेल्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांची मनमौजी सुरू असून, सकाळी कार्यालयात तब्बल ९५ टक्के कर्मचारी उशिरा आल्याचे महापौरांच्या पाहणीत आढळून आले. अनेक कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता; तर काही ठिकाणी एखादा कर्मचारी हजर होता, असे महापौरांनी सांगितले. 

महापालिकेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बेशिस्तीचे कारनामे वारंवार समोर आले आहेत. कार्यालयात वेळेवर यावे, दुपारच्या सत्रात विभागप्रमुखांनी कार्यालयात हजर राहावे, असे आदेश देऊनही उडावाउडवीची उत्तरे देऊन दांड्या मारणे, असे प्रकार पदाधिकाऱ्यांच्या पाहणीत समोर येतात. काही वेळा अशा कर्मचाऱ्यांना दंडही केला जातो; मात्र त्यानंतर ‘पहिले पाढे पंचावन्न’ याप्रमाणे कर्मचाऱ्यांचे काम सुरू आहे. दरम्यान, बुधवारी (ता. चार) महापालिका पदाधिकाऱ्यांसह आयुक्त इंदूर दौऱ्यावर गेल्यामुळे कर्मचारी बिनधास्त झाले होते. कार्यालयात गेलो काय, न गेलो काय, कोण विचारणार? अशी त्यांची धारणा होती; मात्र महापौर नंदकुमार घोडेले हे इंदूरहून गुरुवारी (ता. पाच) पहाटेच शहरात परतले. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता ते महापालिकेत दाखल झाले. दहा वाजले तरी कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. त्यामुळे त्यांनी प्रत्येक विभागात जाऊन १०.३० वाजेपर्यंत तपासणी केली असता ९५ टक्के कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले.

विभागनिहाय हजर कर्मचारी
 लेखा विभाग- तीन 
 शिक्षण विभाग- दोन 
 आस्थापना- दोन
 आरोग्य विभाग- दोन
 विधी विभाग- एक 
 विद्युत विभाग- एकही नाही. 

Web Title: commissioner municipal