आयुक्तांनी लावली २२ रस्त्यांना कात्री

Road
Road

५७ रस्त्यांसाठी लागणार २१२ कोटी, यादीवर आता १३ जूनला सर्वसाधारण सभेत चर्चा
औरंगाबाद - शहरातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी महिन्यात सव्वाशे कोटींच्या निधीची घोषणा केली. तेव्हापासून यादीचा घोळ सुरूच आहे. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी महापौरांनी दिलेल्या रस्त्यांच्या यादीला कात्री लावत २२ रस्ते कमी केले आहेत. ५७ रस्त्यांसाठी तब्बल २१२ कोटी ५५ लाख रुपये लागणार आहेत. या यादीवर आता १३ जूनला सर्वसाधारण सभेत चर्चा होईल.

राज्य शासनाने दिलेल्या शंभर कोटींच्या निधीतून ३१ रस्त्यांची व्हाइट टॉपिंगची कामे सुरू करण्यात आली आहेत. फेब्रुवारीत या रस्तेकामांचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी १२५ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. मात्र, कोणते रस्ते करायचे यावरून सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीत नेहमीप्रमाणे धुसफूस झाली. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी रस्त्यांचा प्रस्ताव कुठे आहे, अशी विचारणा भाजप पदाधिकाऱ्यांकडे केली. यादी पाठविताना तांत्रिक मान्यतेसह पाठवावी अशी सूचना त्यांनी केली. त्यानंतर महापौरांना रस्ते अंतिम करण्याचे अधिकार देण्यात आले. महापौरांनी ७९ रस्त्यांची यादी अंतिम करून ती तांत्रिक मंजुरीसाठी आयुक्तांना दिली. दोन महिन्यांत आयुक्तांनी यादीतील प्रत्येक रस्त्याची पाहणी केली व सोमवारी (ता. तीन) पदाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या रस्त्यांना कात्री लावत यादी ७९ वरून ५७ वर आणली. असे असले तरी ५७ रस्त्यांच्या व्हाइट टॉपिंगच्या कामासाठी २१२ कोटी ५५ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. हा प्रस्ताव अंतिम करून तो आता १३ जून रोजीच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आयुक्तांनी अंतिम केलेले रस्ते, कामे
१. नौबत दरवाजा ते सिटी चौक-४ कोटी   
२. पाणचक्की येथे पूल बांधणे- ८ कोटी
३. मकई गेट येथे पूल बांधणे- १२ कोटी
४. देना बॅंक-औरंगपुरा ते सुराणा बिल्डिंग- २ कोटी
५. चांदणे चौक ते डॉ. सलीम अली सरोवर- ५ कोटी 
६. गांधी पुतळा-सिटी चौक ते पोस्ट ऑफिस- ४ कोटी
७. वरद गणेश मंदिर ते सावरकर चौक ते सिल्लेखाना- ८ कोटी
८. संस्थान गणपती-नवाबपुरा ते जाफर गेट मोंढानाका-५ कोटी 
९. बळवंत वाचनालय-बाराभाई ताजिया ते शनिमंदिर- ३.५० कोटी 
१०. गांधी पुतळा-किराणा चावडी ते अभिनय टॉकीज-५.५० कोटी 
११. पटेल हॉटेल ते रोशन गेट- १.५० कोटी   
१२. रोशन गेट ते कटकट गेट - १.५० कोटी 
१३. पोलिस मेस ते कटकट गेट- ३.५० कोटी
१४. गुलशन महल-जिन्सी चौक ते जालना रोड-४ कोटी 
१५. मदनी चौक ते मध्यवर्ती जकात नाका- ३ कोटी
१६. हर्सूल जेल ते स्मृतिवन - ६ कोटी 
१७. हरसिद्धी माता मंदिर ते नवीन वसाहत-डांबरीकरण-१.७५ कोटी 
१८. गांधी पुतळा ते शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय -१.७५ कोटी
१९. हर्सूल टी पॉइंट ते कलावती लॉन्स (जाधववाडी सर्व्हिस रोड)-३.६० कोटी
२०. एसबीओए शाळा ते कलावती लॉन्स (सर्व्हिस रोड)-३.५० कोटी 
२१. भगतसिंगनगर ते पिसादेवी रोड-डांबरीकरण-२ कोटी
२२. अण्णा भाऊ साठे चौक ते शहागंज चमन- ३ कोटी 
२३. वोक्‍खार्ड कंपनी ते जयभवानी चौक-नारेगाव-३.५० कोटी 
२४. गरवारे स्टॉप ते त्रिदेवता मंदिर सिडको- २ कोटी 
२५. आविष्कार चौक मातामंदिर- १.५० कोटी 
२६. आविष्कार चौक ते भोला पान सेंटर सिडको- २ कोटी  
२७. ग्रीव्हज कॉटन एमआयडीसी ते अनिल केमिकल-जयभवानी चौक-३.५० कोटी 
२८. धूत हॉस्पिटल ते मसनतपूर-शहानगर -३.५० कोटी 
२९. दीपाली हॉटेल-जयभवानी चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन-१० कोटी 
३०. वंजारी मंगल कार्यालय ते श्री. नागरे यांचे घर- २ कोटी
३१. भवानी पेट्रोलपंप ते सी-सेक्‍टर मेन रोड सिडको- २ कोटी 
३२. महालक्ष्मी चौक ते लोकशाही कॉलनी- १.५० कोटी
३३. अग्रसेन भवन ते सेंट्रल एक्‍साईज ऑफिस-२.५० 
३४. आकाशवाणी-त्रिमूर्ती चौक ते गजानन महाराज-चेतक घोडा चौक- ६ कोटी  
३५. जालना रोड ते ॲपेक्‍स हॉस्पिटल- ३.५० कोटी 
३६. रामायणा हॉल ते उल्कानगरी-विभागीय क्रीडा संकुल- ३ कोटी  
३७. अग्निहोत्री चौक ते रिद्धीसिद्धी-विवेकानंद चौक- ४.५० कोटी
३८. जवाहर कॉलनी पोलिस स्टेशन ते सावरकर चौक- ६ कोटी 
३९. कॅनॉट प्लेस अंतर्गत रस्त्यांची कामे- २.५० कोटी 
४०. जळगाव रोड ते अजंता ॲम्बेसिडर हॉटेल- २.५० कोटी 
४१. राज हाईट्‌स एमजीएम ते एन-५ पाण्याची टाकी- २ कोटी 
४२. शंभूनगर ते गादिया विहार- १.५० कोटी
४३. अय्यप्पा मंदिर रोड- ५ कोटी 
४४. आमदार रोड सातारा - ७ कोटी
४५. एमआयटी कॉलेज ते खंडोबा मंदिर-३ कोटी 
४६. शिवमंदिर ते चौसरनगर- १.७५ कोटी
४७. एमआयडीसी ते एमआयडीसी ऑफिस ते वाल्मीकी चौक-४ कोटी 
४८. कामगार चौक-पीरबाजार ते आनंदगाडे चौक-देवगिरी कॉलेज दुभाजक- २ कोटी   
 ४९. गोपाल टी ते गुरुद्वारा-पीरबाजार- ३.५० कोटी 
५०. सिल्लेखाना ते लक्ष्मण चावडी- ४ कोटी 
५१. लक्ष्मण चावडी ते कैलासनगर- ३.५० कोटी 
५२. अमरप्रीत हॉटेल ते एकता चौक- ८ कोटी 
५३. संत एकनाथ रंगमंदिर ते गुरु तेगबहादूर स्कूल- २ कोटी   
५४. आनंदगाडे चौक ते वाल्मीकी चौक- २.५० कोटी 
५५. मुकुंदवाडी शाळा ते स्मशानभूमी रस्ता- १ कोटी 
५६. चिकलठाणा न्यू हायस्कूल ते गणेश रेसिडेन्सी- डॉ. पळसकर यांच्या घरापर्यंत. ३.७० कोटी 
५७. मुकुंदवाडी रेल्वेगेट ते बाळापूर रस्ता बीड बायपास- ४ कोटी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com