आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा दोघांवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

कासारशिरसी - मदनसुरी (ता. निलंगा) येथील गणेश पोतदार (वय ४२) यांनी शुक्रवारी (ता.१८) सकाळी स्वतःच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. 

कासारशिरसी - मदनसुरी (ता. निलंगा) येथील गणेश पोतदार (वय ४२) यांनी शुक्रवारी (ता.१८) सकाळी स्वतःच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. 

या प्रकरणी डॉ. योगेश पाटील यांच्या फिर्यादीवरून कासारशिरसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणी पोतदार यांची पत्नी पूजा यांनी रविवारी (ता.२०) कासारशिरसी पोलिस ठाण्यात आबासाहेब माने व गोविंद बिराजदार (रा. मदनसुरी) यांच्याविरोधात फिर्याद दिली. पोतदार यांनी या दोघांकडून हातउसणे घेतलेले ७० हजार रुपये परत करण्याचा तगादा लावण्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यावरून माने व बिराजदार विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा अधिक तपास येथील सहायक पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे करीत आहेत.

Web Title: commit suicide case in latur

टॅग्स