'जिल्ह्याच्या प्रगतीसाठी कटिबद्ध '

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

लातूर - ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण करणारा एकमेव पक्ष हा शिवसेना आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनदेखील समाजकारणावरच अधिक भर देऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पक्ष प्रयत्न करणार आहे, असे अभिवचन निवडणुकीच्या निमित्ताने वचननाम्यात देण्यात आले आहे. 

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते सोमवारी (ता. 13) येथे वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले. संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख ऍड. बळवंत जाधव, जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, रवी सुडे, सुनीता चाळक उपस्थित होत्या. 

शिवसेने गेल्या काही वर्षांत जनतेसाठी केलेल्या कामाचा आढावाही यात घेण्यात आला आहे. दुष्काळात लातूरकरांसाठी केलेली मदत, जलसिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी राबविलेली शिवजलक्रांती योजना, शहरात 50 टॅंकरने केलेला पाणीपुरवठा, जिल्ह्यात गरीब, आर्थिक दुर्बल, लोकांच्या मोफत केलेल्या शस्त्रक्रिया, वृद्धाश्रमात गाद्या व चादरींचे वाटप, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना केलेली मदत, मोफत नेत्रतपासणी शिबिर घेऊन चष्म्यांचे वाटप, सामुदायिक विवाह, शेतकऱ्यांना पूरक व्यवसायासाठी शेळ्यांचे वाटप अशा अनेक कामांचा यात उल्लेख आहे. 

जिल्हा परिषदेत सत्ता आल्यानंतर प्रत्येक गावास जोडणारे रस्ते तयार करणे, गावागावांत अंतर्गत रस्ते, सौर ऊर्जेअंतर्गत दिवाबत्तीची सोय, आठवडे बाजाराला सुविधा, प्रत्येक गावात समाजमंदिरे, गावातील धार्मिक स्थळांची स्वच्छता, जनतेसाठी आरोग्य शिबिरे, जलसिंचनासाठी साईट तेथे बंधारा, कृषी मेळावे, दुग्धव्यवसाय वाढीस चालना, शुद्ध पाणीपुरवठा देण्याचे अभिवचन देण्यात आले आहे.

Web Title: Committed to the development of the district