पक्षी वाचविण्यासाठी विभागीय आयुक्‍तांनी नेमली समिती 

सकाळने प्रकाशित केलेली बातमी
सकाळने प्रकाशित केलेली बातमी

औरंगाबाद - जायकवाडी धरणावर मच्छीमार व उपद्रवींमुळे पक्ष्यांचा अधिवास धोक्‍यात येत आहे. याबाबत "सकाळ'ने वृत्त प्रकाशित केले होते. प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली. या संदर्भात विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. 28) बैठक घेण्यात आली असून, यात जायकवाडी संवर्धन समिती स्थापन केली आहे. ही समिती कार्यशाळा घेत पक्षी वाचविण्याबद्दल जागृती करणार आहे. 


देशी-विदेशी पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या जायकवाडी पक्षी अभयारण्यात पक्ष्यांचा अधिवास धोक्‍यात आलेला असताना वन्यजीव विभाग मात्र पक्षी महोत्सवात आणि हौशी पक्षीमित्रांच्या झुंडींना पक्षी निरीक्षण करविण्यातच मश्‍गूल असल्याची बाब "सकाळ'ने समोर आणली. तब्बल 33 हजार 379 हेक्‍टरवर पसरलेल्या आणि मुबलक पाणपसारा असलेल्या जायकवाडी धरणाच्या जलाशय परिसराला वर्ष 1986 मध्ये पक्षी अभयारण्य घोषित करण्यात आले. समृद्ध परिसंस्थेमुळे जगभरातील पक्षी अभ्यासकांचे लक्ष इकडे वेधले गेले; परंतु गेल्या काही वर्षांपासून या पक्षीवैभवाला दृष्ट लागली आहे. पक्ष्यांचे थवे कमी होत चालले आहेत.

फ्लेमिंगोंच्या आकर्षणापोटी येथे छायाचित्रकारांची गर्दी तर होतेच; पण ऐन विणीच्या काळातच पाणलोट क्षेत्रात वन्यजीव विभागाचे शिकारी आणि मच्छीमारांवर नियंत्रण न राहिल्याने पक्ष्यांचा अधिवास धोक्‍यात आला आहे. ही बाब "सकाळ'ने आपल्या वृत्तातून अधोरेखित केली होती. त्याची दखल घेत सोमवारी डॉ. भापकर यांनी बैठक घेत समिती गठीत केली. 

पाणथळीच्या जागेवर पक्षी येतात; मात्र तेथे पाणी उपसा व मासेमारी होत असल्याने पक्ष्यांचे अन्न हिरावले जात आहे. तसेच धरणाच्या आजूबाजूला असलेली शेती व त्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या कीटकनाशकामुळे जायकवाडी धरणावर लाखोंच्या संख्येने दाखल होणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे त्यांनी मान्य केले. जायकवाडी क्षेत्रात साफसफाई व अवैध पाणी उपशास प्रतिबंध करावा, असे आदेश यावेळी देण्यात आले. 
  
अशी आहे समिती 
जायकवाडी संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. भापकर असतील. यामध्ये सहअध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. उपविभागीय अधिकारी सदस्य सचिव असून, पैठण नगर परिषदेचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता, वनविभागाचे काळे, पक्षीमित्र दिलीप यार्दी, शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण, व्यापारी संघटनेचे कोटेचा, एक एनजीओचा कार्यकर्ता हे सदस्य असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com