वडार समाजाच्या महामंडळासाठी समिती; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Committee will be constituted for the Vadar community CMs announcement
Committee will be constituted for the Vadar community CMs announcement

लातूर - वडार समाजाच्या उन्नतीसाठी महामंडळ स्थापन्यासाठी एक
समिती स्थापन करण्यात येईल. या समितीचे अध्यक्ष कामगार कल्याणमंत्री
संभाजी पाटील निलंगेकर हे असतील. या समितीत समाजाच्या नेत्यांचा समावेश असेल. तीन महिन्यात अभ्यास करून निधी उपलब्ध करून देवून या महामंडळाचा लाभ समाजाला कसा देता येईल याचा प्रयत्न केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.

येथे रविवारी (ता. ३) वडार समाजाच्या राज्यस्तरीय महामेळाव्याच्या
उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समाजाचे धर्मगुरु ईमाडी
श्रीसिद्धरामेश्वरा स्वामी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कामगार
कल्याणमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, जलसंपदामंत्री प्रा. राम शिंदे,
खासदार डॉ. सुनील गायकवाड, कर्नाटकचे माजी मंत्री अर्जून लिंबावळे,
मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार, महापौर सुरेश पवार,
उपमहापौर देविदास काळे संयोजक पप्पू धोत्रे, दिलीप धोत्रे, बाबा धोत्रे
उपस्थित होते.

घरे, रस्ते, धरणं बांधून समाजाला जगण्याचा आधार देणारा हा समाज आजही उपेक्षित अवस्थेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी बांधणारा, इंग्रजांना नामोहरण करणारा हा मेहनती समाज आहे. लोकांची सेवा करणे ऐवढेच या समाजाला माहित आहे. हा समाज व्हीजेएनटीमध्ये आहे. त्याला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासाठी अभ्यास केला जाईल. समाजाच्या शिष्टमंडळाने मुंबईला यावे. अधिकाऱय़ाना बोलावून कायद्यात बसवून आरक्षण देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे श्री. फडणवीस म्हणाले.

या समाजाच्या विकासासाठी कामगार मंत्रालय पुढाकार घेईल. यात घरे
बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतील निधीसोबत कामगार मंत्रालयाकडून आणखी एक लाखाचा निधी दिला जाईल. शिक्षण, प्रशिक्षण, वृद्धांना पेन्शन, आरोग्य सेवा अशा योजना तयार करण्यात येतील. मजूर संस्था स्थापन करण्यासाठी विशेष परवानगी दिली जाईल. यात आरक्षण ठेवून रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. समाजाच्या महामंडळासाठी कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाईल. यात समाजाच्या नेत्यांचा समावेश असेल. तीन महिन्याच्या आत लाभ कसा देता येईल याचा निर्णय घेतला जाईल, असे श्री. फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार या समाजातील सर्व कामगारांची महिना भरात
नोंदणी करून विविध योजनांचा लाभ दिला जाईल. इतकेच नव्हे तर खडी फोडणाऱ्या मुलांची उच्च शिक्षणापर्यंतचे शुल्क भरण्याची कामगार विभागाकडून सोय केली जाईल, अशी ग्वाही श्री. निलंगेकर यांनी दिली. सामाजिक न्यायासाठी महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी श्री. स्वामी यांनी यावेळी केली. यावेळी श्री. लिंबावळे यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्जून धोत्रे यांनी केले.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com