अक्षयकुमारकडून लाखाचा आहेर

परळी - ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने परळीत शुक्रवारी सर्वधर्मीय सामुदायिक विवाहसोहळा झाला. या वेळी वधू-वरांवर अक्षता टाकताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अक्षयकुमार, पंकजा मुंडे, डॉ. प्रीतम मुंडे व अन्य मान्यवर.
परळी - ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने परळीत शुक्रवारी सर्वधर्मीय सामुदायिक विवाहसोहळा झाला. या वेळी वधू-वरांवर अक्षता टाकताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अक्षयकुमार, पंकजा मुंडे, डॉ. प्रीतम मुंडे व अन्य मान्यवर.

परळी वैजनाथ (बीड) - विवाहसोहळ्यात वऱ्हाडी मंडळींकडून वर-वधुपित्यांना आहेर वा भेट देण्याची पद्धत आहे. या प्रथेचे पालन करीत या विवाहासाठी वऱ्हाडी म्हणून आलेला अभिनेता अक्षयकुमार याने नवदांपत्याला प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत शुक्रवारी केली; तसेच पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसाठी एक कोटी रुपयांची मदत त्याने दिली.

सध्या दुष्काळाने होरपळत असलेल्या वधुपित्यांचा लग्नाचा खर्च वाचावा, यासाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने परळीत आज सायंकाळी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा झाला.

या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता अक्षयकुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सायंकाळी दोघांचेही परळीत आगमन झाले. शहरात सकाळपासूनच या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची लगीनघाई होती. विविध धर्मपद्धतींनी टप्प्या-टप्प्याने मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्‍चन व हिंदूधर्मीय दांपत्यांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com