वंचित, गोरगरिबांच्या विवाहासाठी मंदिरे एकवटली

सुषेन जाधव
मंगळवार, 8 मे 2018

या सोहळ्यात सर्वधर्मीय, गोरगरीब कुटुंबातील ५१ जोडपी विवाहबद्ध होणार असल्याची माहिती धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले यांनी मंगळवारी (ता. ८) पत्रकार परिषदेत दिली.

औरंगाबाद - धर्मादाय आयुक्त मुंबई व धर्मादाय सहआयुक्त औरंगाबाद यांच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील नोंदणीकृत धर्मादाय संस्था (मंदिर ट्रस्ट) तर्फे १२ मे ला वेरूळ (ता. खुलताबाद) येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात सर्वधर्मीय, गोरगरीब कुटुंबातील ५१ जोडपी विवाहबद्ध होणार असल्याची माहिती धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले यांनी मंगळवारी (ता. ८) पत्रकार परिषदेत दिली.

या संस्थांची सामुदायिक विवाह सोहळा समिती तयार करण्यात आली असून या समितीची नोंदणी धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात करण्यात आली आहे. या समितीकडे विविध संस्थांनी आपल्या मंदिराच्या दानपेटीतील रक्कम विवाह सोहळ्यासाठी समितीकडे दिला आहे. ८ मे अखेर समितीच्या खात्यात १३ लाख ५० हजार रुपये रक्कम जमा झाल्याचे समितीचे सचिव दयाराम बसय्ये यांनी सांगितले. यावेळी विवेक सोनुने, एस के मुळे, एस व्ही एच कादरी, ए एस बडगुजर यांच्यासह समितीचे अध्यक्ष आमदार संदीपान भुमरे, सहसचिव राजू कुलकर्णी, कोषाध्यक्ष डॉ प्रवीण वक्ते आदी उपस्थित होते. 

वधूवरांना देणार भेटवस्तू -
वधूवरांना समितीतर्फे ११ हजार रुपये (चेकस्वरूपात), एक ग्रॅम सोन्याचे मणीमंगळसूत्र, ५३ प्रकारची भांडी, १० ग्राम चांदीची जोडवी, १ स्टील कपाट, १चौरंग, २ पाट आदी साहित्य देण्यात येणार आहे. वऱ्हाडी मंडळींच्या भोजनाची व्यवस्था असणार आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: community marriage ceremony has been organized in Temple