मुलांचे विवाह एकत्रितरीत्या लावून दिला खर्चाला फाटा

जवळगा मेसाई (ता. तुळजापूर) - लोखंडे कुटुंबीयांच्या मुलांचा एकत्रित विवाह सोहळा रविवारी उत्साहात पार पडला.
जवळगा मेसाई (ता. तुळजापूर) - लोखंडे कुटुंबीयांच्या मुलांचा एकत्रित विवाह सोहळा रविवारी उत्साहात पार पडला.

तुळजापूर - दुष्काळाच्या झळा तीव्रतेने बसत असतानाही शेतकरी धैर्याने संकटावर मात करीत आहेत. तालुक्‍यातील जवळगा मेसाई येथील पाच शेतकऱ्यांनी दुष्काळी स्थितीमुळे आपल्या मुलांचे विवाह एकाच मांडवात लावून एकत्रित खर्च उचलण्याचा अभिनव उपक्रम राबविला. 

गतवर्षीच्या दोन्ही हंगामांत कुठलेही उत्पन्न मिळाले नसल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. मात्र अशा परिस्थितीला धैर्याने सामोरे जात शेतकरी संकटावर मात करीत आहेत. पाणीटंचाई, आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी जवळगा मेसाई येथील पाच शेतकऱ्यांनी आपल्या मुलांचे लग्न लावताना एकत्रितपणे सर्व खर्च उचलला. गावातील मेसाई मंदिरात आप्पाराव लोखंडे, जगन्नाथ लोखंडे, नरहरी लोखंडे, श्रीपती लोखंडे, तसेच उत्तम लोखंडे यांच्या मुलांचा विवाह सोहळा रविवारी (ता. १२) एकत्रितरीत्या पार पडला. पाचही कुटुंबीयांनी जेवणावळी, मंडप, तसेच पाण्याचा खर्च एकत्रितपणे उचलल्याने आर्थिक बचत झाली. दुष्काळी परिस्थितीत लग्नसोहळ्याचा खर्च उचलणे कठीण असल्याने पाचही शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या या निर्णयाचे गावकऱ्यांनी कौतुक केले. विवाह सोहळ्याला पंचायत समितीचे सभापती शिवाजी गायकवाड, कुलस्वामिनी सहकारी सूतगिरणीचे माजी अध्यक्ष अशोक मगर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मुकुंद डोंगरे, रणवीर चव्हाण, पंचायत समितीचे सदस्य खंडेराव शिंदे, जिल्हा परिषदेचे ज्ञानदेव राजगुरू, पंचायत समितीचे माजी उपसभापती साधू मुळे, बालाजी बंडगर, भाजपचे प्रभाकर मुळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com