नांदेड जिल्ह्यात आचारसंहिता भंगाचे दोन गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

नांदेड : अर्धापूर तालुत्यातील लहान व शहरात विविध पक्षाच्या विनापरवाना टेन्टमध्ये थांबून पक्षाचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांविरूध्द आदर्श आचारसंहिता भंगाचा गुन्हा सोमवारी (ता. २१) रात्री दाखल करण्यात आला आहे. 

नांदेड : अर्धापूर तालुत्यातील लहान व शहरात विविध पक्षाच्या विनापरवाना टेन्टमध्ये थांबून पक्षाचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांविरूध्द आदर्श आचारसंहिता भंगाचा गुन्हा सोमवारी (ता. २१) रात्री दाखल करण्यात आला आहे. 

लहान (ता. अर्धापूर) येथील जिल्हा परिषद हायस्कककुल येथे मतदान केंद्र क्रमांक ५५, ५६, ५७, ५८, ५९ वर मतदान सुरू होते. मतदान केंद्राच्या विनापरवाना २०० मीटरच्या आत कॉग्रेस व भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यानी टेन्ट टाकून येणाऱ्या मतदाराला आपल्या पक्षाचे चिन्ह दाखवून मतदान करण्याचे आमिष दाखवत होते. ही बाब अर्धापूरचे स्थिर नियंत्रण पथक (एसएसटी) प्रमुख बद्रीनाथ मुन्नास्वामी मुदलीयार (वय ३३) यांच्या लक्षात आली. त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना तेथून बाहेर जाण्याचा सल्ला दिला. परंतु ते काही तेथून निघाले नाही. त्यांनी आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन सतीश अण्णासाहेब देशमुख, अशोक विठ्ठलराव सावंत, सदाशिव अशोक इंगळे आणि मंगेश कुऱ्हाडे सर्व राहणार लहान यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तर दुसऱ्या घटनेत याच ठाण्याच्या हद्दीत अर्धापूर शहरातील पाटबंधारे वसाहतीमध्ये असलेल्या मतदान केंद्र क्रमांक ४९व ५० च्या २०० मीटरच्या आत विनापरवाना टेन्ट टाकून आपआपल्या पक्षाचा काही कार्यकर्ते प्रचार करित असल्याचे आढळून आले. यावरून आदर्श आचार संहिता पथकाचे नरेंद्र शिवराम भोसले यांनी अर्धापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन राजेश शेटे, शेख लायक, शिवराज दत्तात्र्य जाधव आणि सखाराम विश्‍वनाथ जाधव यांच्याविरुध्द अर्धापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्याचा तपास फौजदार श्री. आगलावे करित आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: complaint filed of breaking the code of conduct in Nanded District