पत्नीकडून पतीविरोधात बलात्काराची तक्रार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जून 2019

- पत्नीकडून दाखल करण्यात आली बलात्काराची तक्रार.

- अनैसर्गिक कृत्यामुऴे पत्नीची तक्रार.

औरंगाबाद : ती व तो नात्याने पती-पत्नी. पण तो तिच्यावर संशय घेत होता. यातून त्यांच्यात तंटा झाला अन् ते सहा महिन्यांपासून वेगळे राहू लागले. पण यादरम्यान पतीने नांदविण्याचा आग्रह धरला अन् पत्नीची इच्छा नसतानाही शारिरिक संबंध प्रस्तापित केले. अनैसर्गिक कृत्य केल्याने पत्नीही संतापली अन् तिने पोलिस ठाणे गाठून पतीविरुद्धच बलात्काराची तक्रार दिली.

औरंगाबादेत ही घटना घडली. चाळीस वर्षीय महिला गृहीणी आहे. पंधरापेक्षा अधिक वर्षे लग्न होऊन उलटली. तिचा संसारही सुरळीत सुरु होता. परंतु तिचा पती तिच्यावर संशय घेत होता. यातून त्यांच्यात वाद उद्भवले. भांड्याला भांडे लागल्यानंतर त्यांच्यात बेबनाव निर्माण झाला. पतीच्या कटकटीला त्रासून पत्नी सहा महिन्यांपासून वेगळी राहू लागली. पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर दोघांचा वाद समोपचाराने मिटविण्यासाठी पोलिस आयुक्तालयातील महिला सहाय्य कक्ष येथे त्यांचे प्रकरणही सुरु होते. याचदरम्यान परत नांदायला ये, असे सांगून या-ना त्या कारणाने पती तिला आमिष दाखवित होता. यातून त्याने तिच्यासोबत तिच्या मनाविरुद्ध लैंगिक शोषण केले, यासोबतच अनैसर्गिक कृत्य करीत असताना तिने नकार दिला, त्यावेळी त्याने तिला नंतर शिवीगाळ व मारहाण केली.

या प्रकाराला कंटाळून तिने थेट जिन्सी पोलिस ठाणे गाठले आणि पतीविरुद्ध तक्रार दिली. या प्रकरणी पतीविरुद्ध बलात्कार, अनैसर्गिक कृत्य करणे, मारहाण व शिवीगाळ करुन धमकावल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaint registered against Husband by Wife in Rape Case