भारत बंदला परभणी जिल्हयात संमिश्र प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

दलित - आदिवासी संघटनानी पुकारलेल्या भारत बंदला परभणी जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

परभणी -  अनुसूचित जाती, अनुसूचित जमातील प्रतिबंधक कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात दलित - आदिवासी संघटनानी पुकारलेल्या भारत बंदला परभणी जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. गंगाखेड वगळता सर्व तालुक्यातील बाजारपेठा नेहमीप्रमाणे सुरु होत्या. परभणी शहरात दुपारी 12 वाजता राष्ट्रीय चर्मकार महासंघ, बहुजन समाज पक्ष, भीम आर्मी संघटना आदी संघटनाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दुपारी साडेतीन वाजता काही युवक बाजारपेठ बंद करण्यासाठी बाजारात फिरत होते. त्यामुळे शहरात सर्व महत्वाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. गंगाखेड शहरात सकाळपासूनच बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. या ठिकाणी देखील विविध संघटनाच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. उर्वरित पालम, मानवत, पूर्णा, सोनपेठ, पाथरी, जिंतूर, सेलू आदी ठिकाणी बाजारपेठ सुरुळीत सुरु होती.

Web Title: Composite response for Bharat Banda in Parbhani district