LokSabha2019 : काँग्रेसची परिस्थिती टायटॅनिक जहाजासारखीच : नरेंद्र मोदी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

- तुम्ही जेव्हा कमळाचे बटण दाबून मत द्याल. तेव्हा ते मत थेट मला मिळणार आहे.
- 2019 मध्ये तुमच्या मतांमुळे विकासाचा 'हायवे' बनेल.
- काँग्रेस 'व्होट बँकेसाठी काम करते. पण आम्ही 'सबका साथ सबका विकासा'साठी काम करतोय.
- देशाला चालविण्यासाठी मध्यमवर्गांकडून शक्ती मिळते. पण काँग्रेस अशा लोकांना शत्रू मानते.

नांदेड : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हरण्याची भीती असल्यामुळे ते दोन ठिकाणाहून निवडणूक लढवत आहेत. आज काँग्रेसची अवस्था बुडणाऱ्या टायटॅनिक जहाजासारखी झाली आहे. काँग्रेससोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसारखे मित्रही एकतर स्वत: बुडत आहेत किंवा काँग्रेसची साथ सोडून पळ काढत आहेत. नांदेड मध्ये महायुतीच्या उमेदवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत मोदी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर जोरदार टिका केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नांदेड मधील उमेदवार, मंत्री यावेळी उपस्थित होते.

मोदींच्या भाषणातील काही ठळक मुद्दे 
- तुम्ही जेव्हा कमळाचे बटण दाबून मत द्याल. तेव्हा ते मत थेट मला मिळणार आहे.
- 2019 मध्ये तुमच्या मतांमुळे विकासाचा 'हायवे' बनेल.
- काँग्रेस 'व्होट बँकेसाठी काम करते. पण आम्ही 'सबका साथ सबका विकासा'साठी काम करतोय.
- देशाला चालविण्यासाठी मध्यमवर्गांकडून शक्ती मिळते. पण काँग्रेस अशा लोकांना शत्रू मानते.
- महाराष्ट्रात काँग्रेस कमजोर. आपापसात गटबाजी.
- काँग्रेसची परिस्थिती टायटॅनिकच्या जहाजासारखीच.
- भ्रष्टाचार काँग्रेसची परंपरा. अनेक माजी मंत्री न्यायालयाच्या खेपा मारत आहेत.
- काँग्रेसकडून भारताचे तुकडे-तुकडे करण्याचा प्रयत्न सुरु.
- तुम्ही जेव्हा कमळाचे बटण दाबून मत द्याल. तेव्हा ते मत थेट मला मिळणार आहे.
- काँग्रेस 'व्होट बँकेसाठी काम करते. पण आम्ही 'सबका साथ सबका विकासा'साठी काम करतोय.
- देशाला चालविण्यासाठी मध्यमवर्गांकडून शक्ती मिळते. पण काँग्रेस अशा लोकांना शत्रू मानते.
- बंजारा समाजाकडे काँग्रेसने कधी लक्ष दिले नाही.

Web Title: Condition of Congress is like Ship of Titanic says Narendra Modi