अधिपरिचारिकांची लेखी परीक्षा पुन्हा घ्या : याचिकेद्वारे विनंती

सुषेन जाधव
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : आरोग्यसेवा व अभियान आयुक्तांच्या 17 सप्टेंबर 2019 च्या पत्रातील मार्गदर्शक सूचनेनुसार अपात्र ठरवून परीक्षा देण्यास प्रतिबंध केलेल्या अधिपरिचारिकांना परीक्षा देता आली नसल्यामुळे त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. प्राथमिक सुनावणीअंती न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती ए. एस. किलोर यांनी मंगळवारी (ता.एक) प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला.

यापूर्वी खंडपीठाच्या आदेशानुसार सार्वजनिक आरोग्यसेवेतील एक जानेवारी 2012 ते 15 एप्रिल 2015 पर्यंत कार्यरत असलेल्या बंधपत्रित अधिपरिचारिकांना सेवेत सामावून घेण्याकरिता शासनाने 22 सप्टेंबर 2019 रोजी घेतलेली विशेष लेखी परीक्षा याचिकाकर्त्या एकूण 60 अधिपरिचारिकांना देता आली होती. त्यानंतरही ज्यांना ही विशेष लेखी परीक्षा देता आली नाही, अशा सय्यद हिना बानू व इतर अधिपरिचारिकांनी ऍड. सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात ही नवीन याचिका दाखल केली आहे. पुन्हा विशेष लेखी परीक्षा घेण्याचा आदेश शासनाला देण्याची विनंती त्यांनी याचिकेद्वारे केली आहे. याचिकेची पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर होणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: conduct ReExam of Nurses : petition in Aurangabad High Court