esakal | औंढा, सेनगाव तालुक्यात शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याच्या आदेशाने शिक्षकांत संभ्रम
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

राज्यशासनाने ३१आॅगष्ट पर्यत लाॅकडाऊन जाहिर केला असुन शाळा सुरू करण्याचे कोणतेही आदेश नाहीत १५ जुन पासुन आॅनलाईन पद्धतीने शिक्षक विद्यार्थ्यांना अध्यापन करत आहेत. 

औंढा, सेनगाव तालुक्यात शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याच्या आदेशाने शिक्षकांत संभ्रम

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली: जिल्ह्यात औंढा नागनाथ व सेनगाव तालुक्यातील शिक्षकांना शाळेवर  उपस्थित राहावे तसेच   प्रत्येक विद्यार्थ्याला घरी जाऊन अथवा गटागटाने अध्यापन करण्याचे लेखी आदेश काढल्याने शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

दरम्यान, राज्यशासनाने ३१आॅगष्ट पर्यत लाॅकडाऊन जाहिर केला असुन शाळा सुरू करण्याचे कोणतेही आदेश नाहीत १५ जुन पासुन आॅनलाईन पद्धतीने शिक्षक विद्यार्थ्यांना अध्यापन करत आहेत.  अशा परिस्थितीत गटशिक्षणाधिकारी औंढा नागनाथ व सेनगाव यांनी शाळेवर  व  गावात शिक्षकांनी दररोज उपस्थित राहण्यासाठी आदेश काढून सक्ती केली आहे. शासनाने जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यात निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत.

हेही वाचा - राज्यातील २३६ महिला चालकांना कामावर परतण्याची आस

गटशिक्षणाधिकारी मनमानी पणाने आदेश काढून शिक्षकांना वेढीस  

मात्र जिल्हाधिकारी यांनी असे कोणतेही आदेश काढले नसल्याने आदेश पाळावे कोणाचे या विषयी शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. प्रत्येक गावात जाऊन विद्यार्थ्यांना शाळेत बोलावयाचे नाही गट तयार करून मंदिर, मोकळा परिसर  किंवा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सांगण्यात आले आहे. यासंबंधी विद्यार्थ्यांना  कोणत्याच सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाही सध्या वर्क फ्राम होम काम शिक्षक करत असून एक किंवा दोन दिवसाआड शाळेच्या गावात जाऊन विद्यार्थ्यांना केलेल्या गृहपाठ पुर्ण केलेला अभ्यासक्रम तपासत आहेत शासनाने स्पष्ट असे कोणतेही आदेश नसतांना गटशिक्षणाधिकारी मनमानी पणाने आदेश काढून शिक्षकांना वेढीस धरण्याचे काम करत असल्याने शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे.

सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी तान्हाजी भोसले यांची भेट घेऊन निवेदन

आम्हाला स्पष्ट आदेश द्या आम्ही शाळेवर जाण्यास शाळा भरवण्यास तयार आहोत परंतु शिक्षकांना स्पष्ट आदेश देण्याची कोणीही जबाबदारी घेत नाही केवळ शाळेत जा विद्यार्थ्यांना शिकवा असे मोबाईलवर मॅसेज टाकून शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. यासंबंधी वसमत तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी तान्हाजी भोसले यांची भेट घेऊन निवेदन देऊन आम्हाला शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी स्पष्प आदेश द्या आम्ही शाळेत जाण्यास व विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी तयार आहोत अशी मागणी केली आहे. यासंबंधी निवेदनात गटशिक्षणाधिकारी यांना काही मागण्यापण केलेल्या आहेत  याविषयी  वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागवतो एवढेच उत्तर देऊन गटशिक्षणाधिकारी जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे शिक्षकांची अवस्था इतर ना उधर ऐकावे तरी कोणाचे विस्तार अधिकारी उच्चश्रेणी मुख्याध्यापक  केंद्रप्रमुख शिक्षकांना व्हाॅटसपवर मॅसेज टाकून  सक्ती करत आहेत लेखी आदेश काढण्याची जबाबदारी कोणीही घेत नसल्याने शिक्षकांत संभ्रम निर्माण झाला आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image
go to top