'काँग्रेसचा बाजारात आरोप अन् संसदेत मात्र गप्प'

हरी तुगावकर
रविवार, 23 डिसेंबर 2018

लातूर : राफेल विमानांच्य़ा खरेदी व्यवहारातील निर्णय प्रक्रिया, किंमत व भारतीय ऑफसेट पार्टनर या तीनही मुद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने गैरव्यवहार नसल्याचा निर्वाळा दिला आहे. बाजारात जावून केंद्र सरकारवर टीका करणाऱया काँग्रेसपासून महाआघाडीतील पक्ष दूर गेले आहेत. बाजारात टीका करणारी काँग्रेस संसदेत मात्र गप्प बसते, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते प्रा. सुनील नेरलकर यांनी रविवारी (ता.२३) येथे पत्रकार परिषदेत केली.

राफेल विमानांच्या खरेदीबाबत संरक्षण दलाच्या गटांनी सोळा महिने सविस्तर चर्चा केली आहे. योग्य प्रक्रियेनंतर भारत व फ्रान्सचा करार झाला. युपीएच्या काळात कोणताही करार झाला नव्हता. संरक्षण दलात ही विमाने असावीत या करीता पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने पुढाकार घेवून हा करार केला असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केंद्र शासनानाचा निर्णय योग्य होता हे स्पष्ट झाले आहे. कधी नव्हे ते पहिल्यांदा हवाईदलाच्या प्रमुखांनी न्यायालयात जावून माहिती दिली. आता केंद्र सरकारने अर्धवट माहिती दिली म्हणून काँग्रेस कांगावा करीत आहे. काँग्रेसने समाजात जावून कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी राफेल विमान खरेदी करण्याचा दृढ निश्चय केंद्र सरकारचा आहे, असेही श्री. नेरलकर म्हणाले.

या व्यवहाराची माहिती कॅगला देण्यात आली आहे. याचा अभ्यास केल्यानंतर कॅगचा अहवाल संसदेच्या लोकलेखा समितीसमोर जाणार आहे. त्यानंतर तो संसदेत येणार आहे. संसदेत गप्प रहायचे अन समाजात दिशाभूल करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरु  आहे. हा प्रयत्न हाणून पाडून जनतेसमोर सत्य मांडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशात दोन हजार पत्रकार परिषदा घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी नगरसेवक गुरुनाथ मगे, सुनील मलवाड, शहराध्यक्ष शैलेश लाहोटी उपस्थित होते.
 
Web Title: Congress accusations only in the market, but silent in Parliament