इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचा सोमवारी बंद

congress agitation for the fuel price hike
congress agitation for the fuel price hike

नांदेड : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी (ता.10) काँग्रेस पक्षातर्फे भारत बंदचे आयोजन केले आहे. नांदेड जिल्ह्यातही दिवसभर बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती नांदेड उत्तरचे आमदार डी. पी. सावंत यांनी शनिवारी (ता. 8) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी आमदार रावसाहेब अंतापुरकर, हनमंत पाटील बेटमोगरेकर, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, महापौर शिला किशोर भवरे, उपमहापौर विनय गिरडे
पाटील, स्थायी समितीचे सभापती अब्दुल शमीम, अब्दुल सत्तार, विरेन्द्रसिंग 
गाडीवाले उपस्थित होते. 

सावंत म्हणाले, भाजपा जीडीपी वाढल्याचे सांगत आहे. त्यांना विचारायाचे आहे की 'गॅस-डिझेल-पेट्रोल' म्हणजे 'जीडीपी' काय? 2014 मध्ये भाजपाने सत्तेत येण्यापुर्वी जनतेला असंख्य आश्वासने दिली होती. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होऊन साडेचार वर्षे झालेली आहेत. परंतु, एकाही आश्वासनांची पूर्ती झालेली नाही. डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान असतांना 
अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे मूल्य 107.99 एवढे होते. तरी त्यांनी 70 रुपयाच्या जवळपास पेट्रोलचे भाव ठेवले. त्यामुळे सामान्य जनतेला दिलासा मिळाला होता. मोदींच्या काळात 2018 मध्ये कच्च्या तेलाचे भाव 75 च्या जवळपास असताना पेट्रोलचे दर 86-88 रुपयांपेक्षा जास्त आहे. काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात ऊभे करण्याचे कारस्थान भाजपा करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com