vidhan sabha 2019 : कॉंग्रेसने जाहीर केले मराठवाड्यातील उमेदवार, या 11 जणांचा समावेश

योगेश पायघन
रविवार, 29 सप्टेंबर 2019

खोतकर, शिरसाट, भुमरे यांना शिवसेनेकडून एबी फॉर्म 

शिवसेनेकडून राज्यातील काही विद्यमान आमदारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. मराठवाड्यातील जालन्याचे अर्जून खोतकर, औरंगाबाद पश्‍चिमचे संजय शिरसाट यांच्यासह पैठणचे संदीपान भुमरे यांना शिवसेनेचे एबी फॉर्म देण्यात आले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर विद्यमान आमदारांना उमेदवारी देऊ केली आहे. 

विधानसभा 2019
औरंगाबाद -
कॉंग्रेसने राज्यातील 51 उमेदवारींची पहिली यादी रविवारी (ता. 29) जाहीर केली. यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (भोकर), सुरेश वरपूडकर (पाथ्री), अमित देशमुख (लातूर-शहर); तर औरंगाबाद जिल्ह्यातून फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्यासह मराठवाड्यातील 11 जणांचा समावेश आहे. 
 
यादी पुढील प्रमाणे 

  • नांदेड : अशोक चव्हाण (भोकर), डी. पी. सावंत (नांदेड उत्तर), रावसाहेब अंतापूरकर (देगलूर), वसंतराव चव्हाण (नायगाव) 
  • हिंगोली : संतोष टारफे (कळमनुरी) 
  • परभणी : सुरेश वरपूडकर (पाथ्री) 
  • औरंगाबाद : डॉ. कल्याण काळे (फुलंब्री) 
  • लातूर : अमित देशमुख (लातूर शहर), अशोक पाटील निलंगेकर (निलंगा), बसवराज पाटील (औसा) 
  • उस्मानाबाद :  मधुकर चव्हाण (तुळजापूर) 

खोतकर, शिरसाट, भुमरे यांना शिवसेनेकडून एबी फॉर्म 
शिवसेनेकडून राज्यातील काही विद्यमान आमदारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. मराठवाड्यातील जालन्याचे अर्जून खोतकर, औरंगाबाद पश्‍चिमचे संजय शिरसाट यांच्यासह पैठणचे संदीपान भुमरे यांना शिवसेनेचे एबी फॉर्म देण्यात आले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर विद्यमान आमदारांना उमेदवारी देऊ केली आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress announces 11 candidates in Marathwada