कॉंग्रेसवर उमेदवार पुरस्कृत करण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद, ता. 10 : औरंगाबादेत कॉंग्रेसची चांगलीच अडचण झाली आहे. औरंगाबाद पश्‍चिम व पूर्व विधानसभेत तांत्रिक अडचणीमुळे "पंजा' चिन्ह मिळू शकले नाही, त्यामुळे पूर्वमध्ये युसूफ मुकाती तर पश्‍चिममध्ये ऍड. विनोद माळी यांना पुरस्कृत करण्यात आल्याची माहिती शहर जिल्हा अध्यक्ष नामदेवराव पवार यांनी दिली. 

शहरात कॉंग्रेस पक्षाची वाताहत झाली आहे. शहरामध्ये पूर्व आणि पश्‍चिम हे दोन्ही मतदारसंघ कॉंग्रेसच्या कोट्यात आहेत. मात्र, पक्षाअंतर्गत प्रश्‍नांमुळे कॉंग्रेसला या ठिकाणी उमेदवारी देता आली नाही. परिणामी पूर्वमध्ये युसूफ मुकाती व पश्‍चिममध्ये ऍड. विनोद माळी यांना पुरस्कृत करण्यात आले. पूर्व मतदारसंघ कॉंग्रेसने समाजवादी पक्षासाठी सोडला होता; मात्र ऐनवेळी समाजवादी पक्षाबरोबर युती होऊ शकली नाही, त्यामुळे पूर्व मतदारसंघात कॉंग्रेसने अपक्ष असलेल्या युसूफ मुकाती यांना पुरस्कृत केले आहे. दोन्ही मतदारसंघात तांत्रिक अडचणीमुळे उमेदवारांना पंजा चिन्ह मिळू शकले नाही असा दावा शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी केला आहे. एकूणच परिस्थितीमुळे शहराच्या विधानसभा निवडणुकीतून कॉंग्रेस हद्दपार झाल्याची अवस्था निर्माण झाली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress to award candidates