तिसऱ्या टप्प्यात कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष - चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

नांदेड - नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात कॉंग्रेस पक्षाचे आठ नगराध्यक्ष, 126 नगरसेवक आणि दोन नगरपंचायतीत बहुमत मिळविले आहे. यावरून कॉंग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली.

श्री. चव्हाण यांनी हा विजय कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा असल्याचे सांगून त्यांचे अभिनंदन केले. राज्यातील सत्ताधारी भाजपने मोठ्या प्रमाणात सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर केला. या संपूर्ण निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी नांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी पाच सभा घेतल्या तरी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत मेहनतीने यश मिळविल्याचे चव्हाण म्हणाले.

भाजपच्या यशात पैसा आणि सत्तेच्या गैरवापराचा मोठा वाटा आहे, हे या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या पैठण येथील सभेतल्या वक्तव्यावरून, तसेच पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याच्या प्रकरणावरून स्पष्ट झाले आहे. मराठवाड्यात कॉंग्रेसला मोठे यश मिळाले असून हे निकाल म्हणजे आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीतील परिवर्तनाची नांदी आहे, असेही ते म्हणाले.

आतापर्यंत झालेल्या तीन टप्प्यात कॉंग्रेसचे एकूण 34 नगराध्यक्ष आणि 899 नगरसेवक निवडून आले आहेत. नगरपंचायत निवडणुकीतही कॉंग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. आगामी निवडणुकातही कॉंग्रेस पक्षाला चांगले यश मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: congress is big party in third session