उदगीरचे माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

सध्या ते लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली असा परीवार आहे.

लातूर - काँग्रेसचे नेते, उदगीरचे माजी आमदार चंद्रशेखर भोसले (वय ५५) यांचे ह्रदय विकाराने आज (मंगळवार) पहाटे निधन झाले. त्यांच्यावर आज उदगीरमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. 

भोसले यांनी  उदगीर नगर पालिकेचे नगरसेवकपद व बाजार समितीचे संचालकपद भूषविले होते. २००४ ते २००९ पर्यंत उदगीर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार होते. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ते काँग्रेसमध्ये आले होते.

सध्या ते लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली असा परीवार आहे.

Web Title: congress ex mla chandrashekhar bhosale died