काँग्रेसवाले भोगताहेत पापाची शिक्षा; लक्ष्मण माने

हरी तुगावकर
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

लातूर : गेल्या काही वर्षात काँग्रेसने पंडित नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराला सोडले आहे. काँग्रेसने डाव्यांची वाट लावली. त्यात त्यांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. काँग्रेसवाले पापाची शिक्षा भोगत आहेत. असे असले तरी काँग्रेसचा विचार हा राष्ट्रबांधणीचा विचार आहे. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही त्यांच्यासोबत आघाडी करणार आहोत, अशी माहिती महाराष्ट्र  बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी येथे शुक्रवारी (ता.२३) पत्रकार परिषदेत दिली.

वंचित बहुजन आघडीची लोकसभ निवडणुकीत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या भारतीय जनता पक्षाला मदत झाली आहे. त्यामुळे पक्षातून बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी नावाचा पक्षा काढला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहोत. ५० जागाची मागणी आम्ही केली आहे. लातूर जिल्ह्यात दोन जागाची मागणी केली आहे. देशाला हिटलरचा अनुभव घ्यावा लागत आहे. मोदी सरकारमुळे देशाची राज्यघटना, संविधान धोक्यात आले आहे.

सत्तेत भाजपवाले असले तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघच सरकार चालवत आहे. त्यांना संविधान मान्य नाही. त्यांना आपला राज्यघटना, राष्ट्रध्वज मान्य नाही. अफगाणीस्तानमधील तालीबानसारखे हे हिंदी तालीबान आहेत. अशा काळात बहुजन समाजाला वाचवणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला हरवणे हा आमचा अजेंडा आहे. काँग्रेसची अवस्था बिकट आहे. हे मान्य आहे. पापाची शिक्षा ते भोगता आहेत. तरी देखील त्यांचा विचार हा राष्ट्रबांधणीचा आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत. काँग्रेसमधील अनेक जण भाजपमध्ये जात आहेत. ही पळापळ फक्त स्वार्थासाठी, दुकानदारी टिकवण्यासाठी आहे,  अशी  टीका माने यांनी यावेळी केली.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख  ॲड. प्रकाश आंबेडकर हे हटवादी आहेत. त्याचा परिणाम आम्ही लोकसभेत पाहिला आहे. ४८ मतदारसंघात आम्ही उमेदवार उभे केले. आमचेही वाटोळे झाले आणि काँग्रेसचेही वाटोळे झाले आहे. विधानसभेच्या निवडणुकीतही ते तसाच हटवादी पणा करीत आहे. ते पुढचा विचारच करीत नाहीत. मी म्हणजे देश नसतो. आम्ही स्वतःचा नाही तर देशाचा विचार करतो, असे  लक्ष्मण माने म्हणाले. यावेळी रामकृष्ण माने, रामराजे अत्राम उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress is getting punishment of their sins says Laxman Mane