'भाजपाचे आव्हान कॉंग्रेसने स्विकारावे'

'भाजपाचे आव्हान कॉंग्रेसने स्विकारावे'

हिंगोली : भाजप शिवसेनेला शेतकरीविरोधी म्हणणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मागील पंधरा वर्षात केलेली कामे व युती सरकारने मागील पाच वर्षात केलेली कामे यावर चर्चा करायला तयार आहे असे आव्हान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी ( ता.13) विरोधकांना दिले आहे.

हिंगोली येथील कोषागार कार्यालयाची उदघाटनानंतर पत्रकारांशी मुनगंटीवार यांनी संवाद साधला. भाजप-सेना युतीला शेतकरीविरोधी म्हणून बोलले जात आहे. तर काँग्रेस राष्ट्रवादी कडूनही असा आरोप केला जात आहे. मात्र मागील पंधरा वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीने शेतकऱ्यांसाठी कोणती कामे केली याची माहिती त्यांनी द्यावी.

नैसर्गिक आपत्तीमधे पिकांचे नुकसान झाल्यानंतर 50 टक्के नुकसान नंतरच भरपाई देण्याचा काँग्रेसचा निर्णय बदलून 33 टक्के नुकसान झाल्यानंतर भरपाई देण्याचे सरकारने ठरवले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना मदतही केली आहे. राज्यात शेती उत्पन्न वाढविण्यासाठी सिंचनाचे प्रकल्प सुरू केले, तसेच शेतकऱ्यांसाठी असलेल्या  योजनेमध्ये अनुदानही वाढवले आहे. मात्र काँग्रेस राष्ट्रवादीची एकही योजना सरकारच्या हिताची नव्हती असा आरोप त्यांनी यावेळी केला. आघाडी सरकारने मागील पंधरा वर्षात शेतकऱ्यांच्या हितासाठी खर्च केलेला निधी व युती सरकारने पाच वर्षात शेतकऱ्यांच्या हितासाठी खर्च केलेल्या निधी याचे आकडे तपासल्यानंतर कोणते सरकार शेतकरी विरोधी होते हे लक्षात येईल.

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत विकास कामांच्या निधी खर्चाच्या आकड्याबाबत चर्चा करायला आपण कधीही तयार आहोत. काँग्रेसवाल्यांनी आपले आव्हान स्वीकारावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. उत्कृष्ट काम करणाऱ्या नोबेल पुरस्कार दिला जातो. मात्र खोटे बोलणाऱ्यांना  डोबेल पुरस्कार द्यावा अशी उपरोधीकटीकाही त्यांनी विरोधकांवर केली.

युतीच्या काळामध्ये सर्वात जास्त जातीय दंगली घडल्या असे म्हणणाऱ्यांनी आघाडी सरकारच्या काळातील दंगलींचा आकडा व युती सरकारच्या काळातील दंगलींचा आकडा तपासून पाहावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.  जनतेची दिशाभूल करून व खोटे बोलून सत्तेवर येता येत नाही तर त्यासाठी विकास कामे करावी लागतात असेही त्यांनी यावेळी सांगितले. शिवसेना-भाजपाची युती होणारच आहे.त्यासाठी वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com