Loksabha 2019 : भाजप म्हणजे घोषणांचा कारखाना : अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

लाज वाटत नाही का? 
मालेगाव बॉंबस्फोटातील देशविरोधी कारवाया करणाऱ्या प्रज्ञासिंह यांना उमेदवारी द्यायला भाजपला लाज वाटली नाही का? पटक देंगेची भाषा वापरून आज गळ्यात गळे घालून फिरण्यास लाज वाटत नाही का? असा सवाल चव्हाण यांनी केला. 

औरंगाबाद : भाजप सरकार आल्यापासून घोषणांवर घोषणा सुरू आहेत. "सबका साथ, सबका विकास'मधून विकास गायब झाला असून, फक्त मोदींचा विकास सुरू आहे. त्यामुळे आता लोक "अब की बार... बस कर यार' अशा घोषणा देत आहेत. भाजप पक्ष घोषणांचा कारखाना झाला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी (ता. 20) केली. 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांच्या प्रचारार्थ श्री. चव्हाण यांनी गजानन महाराज मंदिर चौकात शनिवारी रात्री सभा घेतली. यावेळी पुढे ते म्हणाले, भाजप सत्तेत आल्यापासून मराठवाड्याची पीछेहाट होत आहे. शहरात कचरा, पाणी, रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. गेल्या पाच महिन्यांत 200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या; मात्र त्याकडे लक्ष देण्यास सरकारला वेळ नाही, अशी टीका चव्हाण यांनी केली. जनतेची सेवा करण्यासाठी मला संधी द्या, असे आवाहन झांबड यांनी केले. दरम्यान, भाजपचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेंद्र साळुंके यांच्यासह समर्थकांनी यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

लाज वाटत नाही का? 
मालेगाव बॉंबस्फोटातील देशविरोधी कारवाया करणाऱ्या प्रज्ञासिंह यांना उमेदवारी द्यायला भाजपला लाज वाटली नाही का? पटक देंगेची भाषा वापरून आज गळ्यात गळे घालून फिरण्यास लाज वाटत नाही का? असा सवाल चव्हाण यांनी केला. 

Web Title: Congress leader Ashok Chavan targets BJP Shivsena alliance