esakal | ईगोमुळेच फिस्कटली कॉंग्रेस-एमआयएम आघाडी : पहा कोण म्हणतंय?
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद ः धनगर समाजाच्या चिंतन बैठकीत आण्णाराव पाटील, यशपाल भिंगे, जगन्नाथ रिठे.

वंचित आणि कॉंग्रेसमध्ये युती व्हायला हवी होती. मात्र, त्यात अनेकांचा इगो आडवा आला. तर, खासदार इम्तियाज जलील यांच्या ईगोमुळे एमआयएमसोबतची आघाडी फिस्कटल्याने वंचितला फटका बसला, असे वंचित नेते व महाराष्ट्र विकास आघाडीचे अण्णाराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ईगोमुळेच फिस्कटली कॉंग्रेस-एमआयएम आघाडी : पहा कोण म्हणतंय?

sakal_logo
By
योगेश पायघन

औरंगाबाद : छोट्या छोट्या समाजगटांना सोबत घेऊन ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यात वंचित बहुजन आघाडीला यश आले नाही. हे खेदजनक आहे. प्रयत्न प्रामाणिक होता. वंचित आणि कॉंग्रेसमध्ये युती व्हायला हवी होती. मात्र, त्यात अनेकांचा इगो आडवा आला. तर, खासदार इम्तियाज जलील यांच्या ईगोमुळे एमआयएमसोबतची आघाडी फिस्कटल्याने वंचितला फटका बसला, असे वंचित नेते व महाराष्ट्र विकास आघाडीचे अण्णाराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

धनगर समाजाची चिंतन बैठक गुरुवारी (ता. सात) चिकलठाण्यात पार पडली. यशपाल भिंगे, ऍड. गंधकराव डोणे, ऍड. अनिरुद्ध येचाळे, सुभाष माने, संतोष कोल्हे, शशीकांत मतकर, रामनाथ मंडलीक, जगन्नाथ रिठे यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाची पीछेहाट झाली. केवळ 1 आमदार धनगर समाजाचा निवडून आला. एकेकाळी 15 -16 सोळा आमदार येत. वंचितचा तर एकही उमेदवार निवडून आला नाही.

वंचितकडे राज्यभरात साडेपाच हजार लोकांनी उमेदवारी मागितली होती. वंचित बहुजन आघाडीने 32 धनगर समाजाचे उमेदवार दिले. त्यापैकी 28 जणांनी निवडणूक लढवली. मात्र, एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे राज्यात लोकसंख्येच्या तुलनेत दुसऱ्या क्रमांकाच्या समाजाची पिछेहाट का झाली. आपण कुठे कमी पडलो याचे चिंतन गरजेचे असल्याचे मत अण्णाराव पाटील यांनी व्यक्त केले. 

हेही वाचा 

तिहेरी तलाकमुळे पतिला तुरुंगवास 

बाईकमध्ये पेट्रोलएवजी डिझेल टाकले तर काय होईल

खोट्या कागदपत्रांद्वारे असा मिळवत होते जामिन