काँग्रेस-राष्ट्रवादीने केली तयारी सुरू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

भाजपचे पत्ते सध्या बंदच, सेना मुलाखतीत गुंग

शिरूर ताजबंद - आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर ताजबंद गटात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीच्या शक्‍यतेमुळे इच्छुक प्रत्येक गावात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. दुसरीकडे भाजप-शिवसेनेची युती अजूनही अनिश्‍चिततेच्या भोवऱ्यात अडकली आहे. आमदार विनायकराव पाटील यांच्या पक्ष प्रवेशाने व जुन्या नेत्यांची पंचाईत झाल्याने भाजपने आपले पत्ते खुले केलेले नाहीत. ऐनवेळी पंचाईत होऊ नये म्हणून शिवसेना उमेदवारांच्या मुलाखतीतच गुंग दिसत आहे. 

गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही काँग्रेस एकमेकांच्या विरोधात लढल्या होत्या. त्यात माजी आमदार बाबासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे खिंड लढवीत होते. तर विद्यमान आमदार पाटील यांनी काँग्रेसचा उमदेवार निवडून आणून राष्ट्रवादीला धक्का दिला होता; पण सध्या परिस्थिती बदलली आहे. आमदार पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपचे कमळ हाती घेतले आहे. 

गेल्या काही दिवसांत काँग्रेस व राष्ट्रवादीपेक्षा आमदार पाटील यांच्या भाजप प्रवेशाने भाजप बळकट झाल्याचे बोलले जात असले, तरी जुने भाजपचेही उमेदवार या मतदारसंघात तुल्यबळ आहेत. गणेश मिल्ट्री कॅम्पवर झालेल्या आमदार पाटील यांच्या सत्कारप्रसंगी माजी सभापती दिलीपराव देशमुख गैरहजर होते. त्यामुळे भाजपमध्ये दुफळी असल्याचे समजते. त्यातच आमदार पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य चंद्रकांत मद्दे, अंजली बिलापट्टे यांनी प्रवेश केला असल्याने शिवसेना-भाजप युती झाली तर कोणाला उमेदवारी देणार, हा प्रश्न युतीकडे भेडसावत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीची शक्‍यता लक्षात घेऊन सध्या तरी युतीच्या नेत्यांपेक्षा जिल्हा परिषद गटातील सर्वच गावांत जाऊन भाजप-शिवसेनेला रोखण्यासाठी रणनीती आखणे सुरू केले आहे.

Web Title: congress-ncp preparation start for zilla parishad election