Loksabha 2019 : हिंगोलीत भाजपच्या नेत्यांना काँग्रेसची ऑफर

congres_bjp
congres_bjp

हिंगोली : हिंगोली लोकसभेमधे राजकिय उलथा पालथ अद्यापही सुरुच असून निवडणुकीत काँग्रेसकडून तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी भाजपाच्या नेत्यांना ऑफर देण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या संदर्भात शनिवारी (ता. 23) रात्री उशीरा पर्यंत निर्णय अपेक्षीत असल्याचे बोलले जात आहे. 

हिंगोली लोकसभा मतदार संघ सतत अनिश्चितता असलेला मतदार संघ 
म्हणून ओळखल्या जातो. काही अपवाद वगळता या ठिकाणी एकाच पक्षाला सलग दुसऱ्यांना विजयी होता आले नाही. विशेष म्हणजे मागील लोकसभेच्या वेळी मोदी लाटेतही या ठिकाणी काँग्रेसचे खासदार अॅड. राजीव सातव विजयी झाले आहेत. 

यावेळी लोकसभा मतदार संघात नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. या लोकसभा मतदार संघात काँग्रेसने पाच वेळा, शिवसेनेने चार वेळा, राष्ट्रवादीने एक वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. अपवादात्मक परिस्थिती वगळता एक उमेदवार दुसऱ्यांदा विजयी झाला नाही. या लोकसभा मतदार संघावर वर्चस्व मिळविण्यासाठी शिवसेनेने नांदेडचे आमदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहिर केली.  

दरम्यान, त्यानंतर काँग्रेसकडून राजकिय हालचाली गतीमान झाल्या असून पक्षीय नेत्यांच्या बैठका झाल्या. यावेळी विद्यमान खासदार अॅड. राजीव सातव यांनी गुजरात निवडणुकीकडेच लक्ष केंद्रीय केले आहे. त्यामुळे यावेळी त्यांनी निवडणुक लढविण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे काँग्रेसकडून तगडा उमेदवार देण्यासाठी भाजपाच्या दोन नेत्यांना काँग्रेस प्रवेश देऊन उमेदवारी देण्याची ऑफर देण्यात आली. यासंदर्भात शुक्रवारी (ता. 22) रात्रभर बैठकाही झाल्या. ज्या भाजप नेत्याला ऑफर मिळाली होती त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन चर्चाही केल्याचे सुत्रांनी सांगितले. तर दुसऱ्या एका नेत्यासही शब्द देण्यात आला आहे. त्या नेत्याची काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यासोबत चर्चा होणार असून काँग्रेसच्या उमेदवारीबाबत शनिवारी (ता. 23) रात्री उशीरा निर्णय अपेक्षीत आहे. 

या निवडणुकीत जातीय समिकरणे लक्षात घेऊन उमेदवारी दिली जात 
असल्याने राजकिय पक्षांची प्रतिष्ठापणाला लागणार आहे. सध्या तरी निवडणुकीत चुरस निर्माण करण्यासाठी काँग्रेस कडून भाजपातील इच्छुकांना ऑफर देण्यात आल्याने लोकसभा मतदार संघात राजकिय उलथापालथ होणार असल्याचे बोलले जात आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com