औरंगाबादेत काँग्रेस पक्षाचे उपोषण 

वृत्तसंस्था
सोमवार, 9 एप्रिल 2018

औरंगाबाद - केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची शांतता, सलोखा धोक्‍यात आला असून, शासनाच्या नाकर्तेपणामुळे भारत बंद दरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. यामध्ये अनेकांचे जीव गेले याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे सोमवार (ता.9) रोजी शहागंज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरु करण्यात आले. 

देशात व राज्यात जाणिवपुर्वक तेढ निर्माण केला जात आहे. पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार येथे दंगली झाल्या आहेत. भिमा कोरेगाव येथे जाणिवपुर्वक दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. संघर्ष निर्माण करणे हा भाजपच्या रणनितीचा भाग झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. 

उपोषण प्रसंगी आमदार सुभाष झांबड, कल्याण काळे, शहर जिल्हाध्यक्ष नामदेव पवार, समीर अब्दुल सत्तार, जितेंद्र देहाडे, बाबा तायडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Web Title: Congress party fasting in Aurangabad