कचराकोंडीच्या विरोधात  काँग्रेसची कचरा दिंडी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

औरंगाबाद : पाच महिन्यानंतरही शहरातील कचराप्रश्‍न कायम असल्याने महापालिका प्रशासन व सत्ताधारी शिवसेना-भाजपाच्या निषेधार्त शहर काँग्रेसतर्फे शनिवारी (21) कचरा दिंडी काढण्यात आली. महापालिका बरखास्त झालीच पाहिजे, भाजप सरकारचा निषेध असो, अशा जोरावर घोषणा यावेळी देण्यात आल्या.

पैठणगेट येथून दुपारी 12 वाजता दिंडीला सुरुवात झाली. एक वाजेच्या सुमारास दिंडी महापालिकेत पोचली. यावेळी महापालिका प्रशासन शिवसेना-भाजप युतीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. दिंडीत जगन्नाथ काळे, इब्राहीम पठाण, बाबा तायडे, नगरसेविका सायली जमादार, काँग्रेस महिला आघाडीच्या सरोज मसलगे, रेखा जैस्वाल, सुनिता तायडे, पंकजा माने आदींचा सहभाग होता. शिवसेनेचे खासदार चंदकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव हे एकाच माळेचे मणी आहे. जनतेला मूर्ख बनवण्याचे काम सध्या सुरू आहे, अशी टीका काँग्रेस शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी केली.

नामदेव पवारांची जीभ घसरली

माजी आमदार तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव पवार यांची या वेळी जीभ घसरली. त्यांनी महापालिका पदाधिकारी बाबत शिवराळ भाषा वापरली.

Web Title: congress protest against garbage issue