नोटाबंदीविरोधात कॉंग्रेसची निदर्शने 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

बीड - केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदी निर्णयाविरोधात, तसेच त्यामुळे झालेल्या भ्रष्टाचाराची निःपक्षपातीपणे चौकशी करून झालेल्या नुकसानीची नागरिकांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी जिल्हा कॉंग्रेस कमिटीने मागण्यांचे निवेदन शुक्रवारी (ता. सहा) जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. यावेळी कॉंग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. 

केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाविरुद्ध जिल्हा कॉंग्रेस समितीतर्फे शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी कॉंग्रेसतर्फे तीव्र निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी पक्षनिरीक्षक दिग्विजयसिंग यांच्यासह बीड जिल्हा प्रभारी शिवाजीराव पाटील कव्हेकर, सहप्रभारी प्रा. सत्संग मुंडे, जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आमदार डॉ. नारायण मुंडे, प्रदेश सरचिटणीस टी.पी.मुंडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रा.सर्जेराव काळे, महिला प्रदेश चिटणीस जयश्री पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनाक्षी पौंडुळे, महादेव धांडे, फरीद देशमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी बोलताना दिग्विजयसिंग म्हणाले की, केंद्र सरकारने नोटाबंदीचा जो जाचक निर्णय घेतला आहे, तो सामान्यांसाठी अडचणीचा ठरत आहे. नोटाबंदीमुळे देशात आर्थिक अराजकता निर्माण झाली आहे. देशातील कृषी अर्थव्यवस्था संकटात आली असून लहानमोठे उद्योग धोक्‍यात आले आहेत. सामान्यांसाठी या निर्णयाविरोधात कॉंग्रेस पक्ष रस्त्यावर उतरल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी शिवाजीराव कव्हेकर म्हणाले की, नोटाबंदी हा भारतातला सर्वात मोठा घोटाळा आहे. नोटाबंदी करण्याअगोदर सरकारने पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे देशातील शेतकरी, कामगार, व्यापारी व सामान्य जनतेवर खऱ्या अर्थाने सर्जिकल स्ट्राईक झाले आहे. देशातील परिस्थिती सुरळीत न झाल्यास सामान्य जनता सरकारला माफ करणार नाही, असेही ते म्हणाले. यावेळी ऍड.सुरेश हात्ते, महादेव मुंडे, सीताराम गव्हाणे, नवनाथ थोटे, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष राहुल टेकाळे, ग्रंथालय विभागाचे विठ्ठल जाधव, ओबीसी सेलचे गणेश राऊत, एससी सेलचे गोविंद साठे, सेवादलाचे शहादेव हिंदोळे, कुंदा काळे, ऍड. डोईफोडे, हरिभाऊ सोळंके, डॉ. सुनील नागरगोजे, युवराज कोकाटे, ऍड. विनोद निंबाळकर, रामेश्वर जाधव, राणा चव्हाण आदी उपस्थित होते.

Web Title: Congress protests against notabandi