काँग्रेसची जेपीसीची मागणी फसवी : अॅड.प्रकाश आंबेडकर

हरी तुगावकर
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

लातूर : भारतीय जनता पक्ष व काँग्रेसला राफेलप्रकरणाची खऱी माहिती जनतेसमोर येवू द्यायची नाही. निवडणुकीच्या अगोदर ही माहिती समोर येवू नये अशीच पावले दोन्ही पक्षाकडून टाकली जात आहेत. या प्रकरणी काँग्रेसने केलेली जेपीसीची मागणी ही तर फसवी आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. बोफर्स प्रकरण भ्रष्टाचाराशी संबंधित होते तर राफेल प्रकरण हे देशाच्या सुरक्षीततेशी खेळल्याचे प्रकरण आहे, असा आरोपही त्यांनी केला.

येत्या नव्वद दिवसानंतर लोकसभा निवडणुका असणार आहेत. सध्याच्या सभागृहात असलेले अर्धवट काम तेथेच संपते. पुढच्या सभागृहात त्याला महत्व राहत नाही. काँग्रेसला खरेच हे प्रकरण बाहेर काढायचे असते तर त्यांनी पब्लिक अकाऊंट कमिटीकडे ही मागणी केली असते. या कमिटीचे अध्यक्ष काँग्रेसचेच नेते मल्लिकार्जून खर्गे हे आहेत. या कमिटीने राफेलची कागदपत्रे मागितली असती तर ती सरकारला देणे बंधनकारक होती. काँग्रेसने ही कागदपत्र का मागितली नाहीत याचा पहिल्यांदा खुलासा करावा. आता त्यांची जेपीसीची मागणी ही फसवी आहे. इतकेच नव्हे तर काँग्रेसने सभागृहात या प्रकरणाची कंट्रोलर आणि आॅडिटर जनरल यांनी चौकशी करून अहवाल सादर करावा असा ठराव जरी घेतला असता तरी दूध का दूध पाणी का पाणी झाले असते असे आंबेडकर म्हणाले.

राफेलमध्ये शंभर टक्के घोटाळा आहे. या व्यवहारात विमानाची किंमत एक हजार कोटी रुपयांनी कशी वाढली याचा खुलास सरकार करीत नाही. तसेच या व्यवहारात फ्रान्स सरकारने कोणतीही गॅरंटी दिलेली नाही. या विमानाचा एखादा पार्टही खराब झाला तर ते कचऱयाच्या टोपलीत टाकावे लागणार आहे. यात फ्रान्स सरकारने कोणतीही हमी घेतलेली नाही. हा खरा मुद्दा आहे, असे आंबेडकर म्हणाले.

स्वतंत्र लढणार
आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आम्ही काँग्रेसला प्रस्ताव दिला होता. पण काँग्रेस अद्याप रिअॅक्ट झालेली नाही. काँग्रेसने आमचा प्रस्ताव मान्य न केल्यास आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवू अशी माहिती श्री. आंबेडकर यांनी यावेळी दिली.

Web Title: Congress s JPCs demand is fake says Prakash Ambedakr