अशोक चव्हाण द्विधा मनस्थितीत; काय घेणार निर्णय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसची वाताहत झाली. या पराभवाची नैतिक जबाबदारी चव्हाण यांनी स्वीकारुन कारणमीमांसा करु असे म्हटले. मात्र, प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनाम्या संदर्भात चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य आहे.. अशी प्रतिक्रिया देत चव्हाण यांनी राजीनाम्यावर भाष्य करणे टाळल आहे.

नांदेड : नांदेडमध्ये भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव झाल्यानंतर भविष्यातील निर्णयाबाबत ते द्विधा मनस्थितीत आहेत. 

लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसची वाताहत झाली. या पराभवाची नैतिक जबाबदारी चव्हाण यांनी स्वीकारुन कारणमीमांसा करु असे म्हटले. मात्र, प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनाम्या संदर्भात चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य आहे.. अशी प्रतिक्रिया देत चव्हाण यांनी राजीनाम्यावर भाष्य करणे टाळल आहे.

काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांचा अमेठीतून झालेला पराभव आणि देशात काँग्रेसची पिछेहाट झाली. याची जबाबदारी स्वीकारुन राहुल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षप्रमुखच राजीनामा देणार असल्याने अशोक चव्हाण यांना आपल्यालाही राजीनामा द्यावा लागेल काय किंवा काय निर्णय घ्यावा अशी द्विधा मनस्थिती झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress state president Ashok Chavan take decision after defeat in Loksabha election