आगामी काळात महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ताः अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

नांदेड जिल्हा काँग्रेस पक्षाचा आहे. आपले यश हे आपली जमेचू बाजू आहे. नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूक भाजप विचारसरणीच्या विराेधात हाेणार आहे. त्यासाठी नांदेड महापालिका काँग्रेसच्या ताब्यात आली पाहिजे. नांदेडसह मराठवाड्यात काँग्रेस पुढे राहिली पाहिजे

मुदखेड - "२०१९ मध्ये हाेणाऱ्या विधानसभेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची सत्ता आणणे हीच माजी पंतप्रधान (स्व.) राजीव गांधी यांना खरी श्रद्धांजली असेल. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्या दृष्टीने कामाला लागावे,'' असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशाेक चव्हाण यांनी रविवारी (ता. २१) नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या काार्यालयात माजी पंतप्रधान (स्व.) राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहताना केले.

नवा माेंढा भागातील जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात यामध्ये आज सकाळी अकरा वाजता (स्व.) राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. "(स्व.) राजीव गांधी यांनी आपल्या कार्यकाळात उफाळलेला दहशतवाद संपविण्याचे माेठे प्रयत्न केले हाेते. जिल्हा पातळीपासून ते देशपातळीपर्यंत दहशतवादाचा बिमाेड झालाच पाहिजे, केंद्र व राज्यातील भाजपचे सरकार सामान्य नागरिकांचे कंबरडे माेडणारे निर्णय घेत आहे, या निर्णयाचा निषेध करा.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किमती कमी झालेल्या असताना देखील या सरकारने महाराष्ट्रात प्रतिलिटर अकरा रुपये जादा भाव वाढवला आहे. यामुळे दळणवळणासह इतर जीवनावश्‍यक वस्तूंवर परिणाम हाेत आहे. नांदेड जिल्हा काँग्रेस पक्षाचा आहे. आपले यश हे आपली जमेचू बाजू आहे. नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूक भाजप विचारसरणीच्या विराेधात हाेणार आहे. त्यासाठी नांदेड महापालिका काँग्रेसच्या ताब्यात आली पाहिजे. नांदेडसह मराठवाड्यात काँग्रेस पुढे राहिली पाहिजे. पक्ष टिकला तर आपण टिकू. पक्ष बांधणीतून पक्षाची ताकद वाढली पाहिजे. यासाठी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी कामाला लागावे,'' असे खासदार चव्हाण म्हणाले.

पणन महासंघाचे संचालक सदस्य नामदेवराव केशवे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गाेविंदराव शिंदे नागेलीकर यांनी आभार मानले. या वेळी भाऊराव चव्हाण उद्याेग समुहाचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण, बाजार समितीचे सभापती बी. आर. कदम, बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पापा माेदी, प्रा. कैलास दाड, श्‍याम दरक, सुभाष देशमुख, संजय देशमुख लहानकर, अविनाश कदम, संताेष मुळे, महापाैर शैलजा स्वामी, सभापती शीला निखाते, उपमहापाैर शफी अहेमद कुरेशी, चेअरमन गणपतराव तिडके, मंगला निमकर, सुमती व्याहाळकर, कविता कळसकर, प्रा. ललिता बाेकारे, आनंद गुंडिले, शेषराव चव्हाण, मंगाराणी आंबुलगेकर, अनिता हिंगाेले, मुन्ना अब्बास, विजय येवनकर, गंगाधर साेंडारे, बलवंतसिंग गाडीवाले, विश्‍वास कदम, सत्यजीत भाेसले, गंगाधर डांगे, भीमराव पाटील कल्याणे, शत्रुघ्न गंड्रस, रामराव खांडरे यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती हाेती.

Web Title: Congress would come to power, says Ashok Chavan