धर्माबाद तालुक्यात संततधार पाऊस सुरूच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

धर्माबाद : शहरासह धर्माबाद तालुक्यात तीन दिवसांपासून संततधार पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दोन दिवसांपासून धर्माबादकरांना सूर्यदर्शन झाले नाही.

धर्माबाद तालुक्यात तीन मंडळ आहेत. धर्माबाद मंडळात - २० (५८७) मिमी, जारीकोट मंडळात - १२ (२९१) मिमी, करखेली मंडळात - २४ (३९८) मिमी, असे धर्माबाद तालुक्यात एकूण - ५६ (१३००) मिमी. एवढा पाऊस पडल्याची नोंद शुक्रवारी सकाळी सात वाजता करण्यात आल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली.

बुधवारी रात्रीपासून सुरू झालेला संततधार पाऊस शुक्रवारी सकाळीही श्रावणी सरी संततधार बरसत आहेत. यामुळे शहरातील सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे. संततधार पाऊस सुरूच असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी कापूस पिकांवरील गुलाबी बोंडअळी व मूग, उडीद, सोयाबीन पिकांवरील मावा रोगाने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: continue rain in dharmabad