सततच्या पावसामुळे खरीप पिकांना फटका 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

गेवराई, (जि. बीड) : तालुक्‍यात गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत आहे. यामुळे काही भागांतील जनावरांच्या चाऱ्यासह पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे; परंतु खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होत आहे. 

पावसाळा सुरू झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनंतर तालुक्‍यात समाधानकारक पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे काही भागांतील जनावरांच्या चाऱ्यासह पाणीप्रश्न मार्गी लागला आहे; परंतु खरीप हंगामातील कपाशी, बाजरी, तीळ, भुईमूग इत्यादींसह अन्य पिकांची नासाडी होत आहे.

कपाशी या पिकाला जास्त ओलावा झाल्याने रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामध्ये तण देखील जास्त वाढले आहे. अधिक पाण्यामुळे पीक पिवळे पडत आहे, तर बाजरी या पिकाचे पाण्यामुळे कणसातील दाणे काळे पडू लागले आहेत. हाती आलेले पीक वाया जात आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: continuous rain dameges crops