esakal | करार शेती पध्दतीने शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मालकी हक्कावर कधीच गदा येणार नाही- पाशा पटेल 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

येथील भाजपा कार्यालयात सोमवारी कृषी धोरणावर आधारित पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अँड. शिवाजीराव जाधव ,माजी आमदार गजानन घुगे, सुरजितसिंह ठाकूर ,विनायक भिसे, संतोष टेकाळे, पप्पू चव्हाण, मिलिंद यंबल आदींची प्रमुख उपस्थिती होती.

करार शेती पध्दतीने शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मालकी हक्कावर कधीच गदा येणार नाही- पाशा पटेल 

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : केंद्र शासनाने नुकत्याच पारित केलेल्या कृषी कायद्याच्या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये भ्रम पसरवले जात आहेत. वास्तवात करार शेती पद्धतीला नरेंद्र मोदी सरकारने कायद्याचे स्वरूप दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मालकी हक्कावर कधीच गदा येणार नाही. असे स्पष्टीकरण राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी हिंगोली येथे सोमवारी (ता. १४) पत्रकार परिषदेत बोलताना मत व्यक्त केले.

येथील भाजपा कार्यालयात सोमवारी कृषी धोरणावर आधारित पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अँड. शिवाजीराव जाधव, माजी आमदार गजानन घुगे, सुरजितसिंह ठाकूर, विनायक भिसे, संतोष टेकाळे, पप्पू चव्हाण, मिलिंद यंबल आदींची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा -  नांदेड जिल्ह्यात लग्नातील वाढती गर्दी चिंताजनक, अनलॉकमध्ये नागरिक झाले बिनधास्त -

बोलताना पुढे म्हणाले, केंद्र शासनाने जो कायदा पारित केला आहे. त्या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे कुठे ही नुकसान होणार नाही. मात्र नुकसान होणार त्यांचे होणार चुकीच्या गोष्टी जे करतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये मात्र कोण जाणे, शेतकऱ्यांना आंदोलन करण्यास भाग पाडत आहेत, कुणास ठाऊक.या कायद्यावरून विरोधक केवळ राजकारण करत आहेत. शेतकर्‍याला पुढे करून त्यांना त्यांची पोळी भाजून घ्यायची असल्याचा टोला राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी विरोधकांना लगावला.

कोणताही निर्णय हा शेतकऱ्याच्या हितासाठीच घेतला जातो. शेतकऱ्याचे नुकसान व्हावे असे कुणालाच वाटत नाही. त्याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून हा कायदा लागू केला आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊन मुख्य म्हणजे त्यांची लूट थांबणार आहे.  शेतकरी सोडून इतरांचे या कायद्यामुळे नुकसान होणार असेल म्हणूनच तर ते या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरत आहेत. मात्र खरी परिस्थिती अशी आहे .शेतकरी जगला पाहिजे यासाठी केंद्र शासनाने हे कायदे पारित केले आहेत. मात्र स्वतः ची पोळी भाजून घेण्यासाठी विरोधक शेतकऱ्यांसमोर आंदोलन करून या कायद्या विरोधात भडकवण्याचे काम करीत असल्याचे सांगून या कृषी कायद्याला फक्त एका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध असून, इतर सर्वच संघटनेचा पाठींबा असल्याचेही पाशा पटेल यांनी स्पस्ट केले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या कायद्याला देशभरात प्रचंड विरोध केला जात आहे. पंजाब, लुधियाना यांनी ही कायदा रद्द करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. मात्र शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करून आंदोलन करण्यास भाग पाडले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

संपादन-  प्रल्हाद कांबळे