वादग्रस्त पोलिस अधिकारी नवटके यांची बदली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

बीड : माजलगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी भाग्यश्री नवटके यांची औरंगाबादला बदली झाली असून गेवराईचे अर्जुन भोसले यांच्याकडे येथील पदभार सोपविण्यात आला आहे. कथित व्हिडिओतील संभाषणामुळे त्या वादात सापडल्या होत्या. दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्याकडे त्यांची चौकशी सोपविण्यात आली आहे. 

आयपीएस असलेल्या भाग्यश्री नवटके यांचा सध्या परिविक्षाधिन कालावधी सुरू असून त्यांनी वर्षभरापूर्वी माजलगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी पदाचा पदभार घेण्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात पोलिस निरीक्षक म्हणून काम केले. माजलगावचा पदभार घेतल्यानंतर या भागातील अवैध धंद्यांवर वचक बसविण्याबरोबर अवैध वाळू उपशाविरोधातही त्यांनी जोरदार मोहीम राबविली. समाजविघातक शक्तींना त्यांनी काबूत आणले; मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांच्या संभाषणाचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यातील वादग्रस्त संभाषणामुळे रविवारी (ता. दोन) त्यांची चौकशी लावण्यात आली होती. तर, सोमवारी त्यांच्याविरोधात विविध संघटनांनी जिल्ह्यात आंदोलने करून त्यांच्या बडतर्फीची मागणी केली होती. दरम्यान, सोमवारी त्यांच्या बदलीचे आदेश निघाले असून त्यांची औरंगाबादला बदली करण्यात आली.

Web Title: Controversial Police Officer Bhagyashree Navtake transfer