Loksabha 2019 : उमेदवारीवरून कॉंग्रेसमध्ये काथ्याकूट 

Loksabha 2019 : उमेदवारीवरून कॉंग्रेसमध्ये काथ्याकूट 

औरंगाबाद - लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातील उमेदवारीवरून कॉंग्रेसमध्ये काथ्याकूट सुरूच असून, बुधवारी (ता. 20) हा विषय थेट प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यापर्यंत गेला. जिल्ह्यातील प्रमुख कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून त्यांच्याकडे भावना व्यक्त केल्या. बाहेरून आलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्यास विरोध असून, औरंगाबादची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडू नका, अशी गळ यावेळी घालण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातून कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारीची उत्सुकता कायम आहे. उस्मानाबाद मतदारसंघ कॉंग्रेसला आणि औरंगाबाद राष्ट्रवादीला देण्यासंदर्भात नव्याने चर्चा सुरू झाली आहे. या प्रस्तावावरदेखील दिल्लीत खलबते सुरू आहेत. दुसरीकडे शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्या नावाची चर्चादेखील सुरू होती. त्यामुळे कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असली, तरी अद्याप कोणी उघडपणे भूमिका घेतलेली नाही. जाधव यांना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांचे काम करणार नाही, असा पवित्रा घेत काहींनी बंडाचे निशाण उगारल्याची देखील चर्चा आहे. दरम्यान, बुधवारी (ता. 20) सुभाष झांबड यांच्या निवासस्थानी वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, कन्नड आणि शहरातील पूर्व, पश्‍चिम, मध्य अशा सर्वच मतदारसंघांतील पदाधिकारी, शहराध्यक्ष, महिला पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य व इतर पदाधिकारी जमले. सकाळी त्यांनी अशोक चव्हाण यांच्यासमोर आपापल्या भावना व्यक्त केल्या. आमदार झांबड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ""उमेदवार कोण असावा? याबाबत कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद झाला. यावेळी मी तिथे उपस्थित नव्हतो. कार्यकर्त्यांनी आपले म्हणणे प्रदेशाध्यक्षांकडे मनमोकळेपणाने मांडल्या आहेत. उमेदवारी कुणाला द्यायची याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com