वाहतूक पोलिसांसाठी आता कूल जॅकेट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

बीड - सध्या बीड पोलिस दलाकडून अनेक योजना राबविल्या जात असून, बॉडीवॉर्न कॅमेऱ्यानंतर आता वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांसाठी कूल जॅकेट देण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांची उकाड्यापासून सुटका होणार आहे. 

बीड - सध्या बीड पोलिस दलाकडून अनेक योजना राबविल्या जात असून, बॉडीवॉर्न कॅमेऱ्यानंतर आता वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांसाठी कूल जॅकेट देण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांची उकाड्यापासून सुटका होणार आहे. 

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून जिल्हा पोलिस दलात अनेक प्रभावी योजना राबविल्या जात आहेत. पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांचा कारभार पारदर्शक कारण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात आता शहर वाहतूक शाखेकडे विशेष लक्ष दिले असून, बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांचा उपक्रम सुरू केल्यानंतर आता वाहतूक कर्मचाऱ्यांना कूल जॅकेट दिली आहेत. याचा फायदा उन्हात काम करताना कर्मचाऱ्यांना होणार आहे. सध्या शहरातील तापमान ४०च्या पुढे असून दुपारच्या वेळेत शहरातील रस्ते मोकळे दिसतात. मात्र, शहरातील चौकाचौकात वाहतूक कर्मचारी कर्तव्य बजावताना दिसत आहेत. या कर्मचाऱ्यांना उकाड्याचा सामना करावा लागत होता. मात्र, आता हा प्रश्न सुटला आहे. 

...असे कूल राहणार जॅकेट
शहर वाहतूक कर्मचाऱ्यांना कूल जॅकेटचा वापर करताना पाच मिनिटे आधी हे जॅकेट पाण्यात भिजून पिळून काढावे लागेल. हे जॅकेट घातल्यानंतर सहा तास थंड राहणार आहे. यासाठी कूल टोपीही देण्यात आली आहे. बीडमध्ये आता वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना उन्हाच्या उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

Web Title: Cool jacket for traffic police

टॅग्स