कूलर वापरताना... दक्षता बाळगा अन्‌ अपघात टाळा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

औरंगाबाद - पाण्याचा वापर असलेले कूलर वापरताना अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.  

उकाड्यापासून बचाव करण्यासाठी घर, दुकान, कार्यालयांत मोठ्या प्रमाणात कूलरचा वापर सुरू झाला आहे. कूलर वापरताना पुरेशी काळजी न घेतल्याने अपघात झाल्याच्या अनेक घटना दरवर्षी घडतात. 

त्यासंबंधी काळजी घेण्यासाठी कूलरला ‘अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर्स’ बसवून घ्यावे. विजेचा धक्का बसताच या उपकरणामुळे वीजप्रवाह खंडित होतो. त्याचप्रमाणे कूलरचा वापर नेहमी थ्री-पिन प्लगवरच करावा. घरातील अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करून घ्यावी. फायबर बाह्य भाग असलेल्या व चांगल्या प्रतीच्या कूलरचा वापर प्राधान्याने करावा. लहान मुले कूलरच्या संपर्कात येणार नाहीत याची खबरदारी घेऊनच कूलरची जागा निवडावी. ओल्या जमिनीवर उभे राहून पंप सुरू करू नये, पंपातून पाणी येत नसेल तर पंपाचा वीजपुरवठा आधी बंद करावा. त्यानंतरच थ्री पिन प्लग काढल्यानंतर पंपाला हात लावावा, अशा सूचना महावितरणातर्फे देण्यात आल्या आहेत.

घ्यावयाची काळजी...
कूलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी वीजप्रवाह बंद करून प्लग काढावा.
कूलरच्या आतील वीजतार पाण्यात बुडणार नाही याची काळजी घ्यावी.
कूलरमधील पाणी जमिनीवर सांडणार नाही याची काळजी घ्यावी.
पंपाला वीजपुरवठा करणारी वायर पाण्यात बुडालेली नसावी.
पंपाचे अर्थिंग योग्य असल्याचे तपासून घ्यावे. 
पंपातून वीज प्रवाहित होत नसल्याची खात्री करावी.

Web Title: cooler use alert accident care