कोथिंबिरीला सोन्याचा भाव; पंधरा रुपयांना 50 ग्रॅम कोथिंबीर

latur
latur

लातूर : तीस-चाळीस रुपयांच्या भाज्या घेतल्यावर अगदी फ्री मिळणारी किंवा दोन-चार रुपयांना एक जुडी (गड्डी) मिळणाऱ्या कोथिंबीरीला सध्या सोन्याचा भाव आला आहे. जुडी पद्धत बंद करून शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी कोथिंबीर आता वजनावर विकायला सुरवात केली आहे. पंधरा रुपयांना 50 ग्रॅम, या भावाने कोथिंबिरीची विक्री होत आहे. इतर पालेभाज्या तर बाजारातून गायबच झाल्या आहेत.

पावसाळा सुरू झाला असला तरी लातुरात अद्याप पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे दुष्काळाची स्थिती कायम आहे. याचाच परिणाम पालेभाज्यांच्या भावावर झाला आहे. मागील वर्षी जून-जुलै महिन्यात कोथिंबिरीची जुडी पाच रुपयांना मिळत होती. पण पाण्याची उपलब्धता नसल्याने यंदा मात्र कोथिंबीरीचे भाव गगनाला भिडले आहेत. सर्रास पहायला मिळणाऱ्या मेथी, शेपू, पालक या पालेभाज्या तर बाजारात अभावाने कुठेतरी पहायलाही मिळत आहेत. 30 ते 40 रुपये जुडी, या भावाने पालेभाज्यांची विक्री होत आहे.

दयानंद लुंगसे (शेतकरी) म्हणाले, "मागच्या वर्षी याच दिवसांत 20 रुपये किलो या भावाने बाजारात कोथिंबीर विकली आहे. ग्राहकांना एक, दोन रुपयांना जुडी मिळत होती. आता मात्र दुष्काळामुळे कोथिंबीर उपलब्ध नाही. त्यामुळे भाव 100 ते 150 रुपये किलोपर्यंत वाढले आहेत. याचा शेतकऱ्यांना फायदा असला तरी ग्राहकांना नाही, याची आम्हाला जाणीव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com